पूर्णा.:
शहरातील गजबजलेल्या ठिकाणी असलेली नरसिंग बावडी नावाच्या विहिरीत दिनांक 26/12 रोजी सायंकाळच्या सुमारास अज्ञात इसमाचा मृतदेह तरंगताना दिसला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आणि नगरपालिका कर्मचाऱ्यास प्राचारण करून मृतदेह वर काढण्यात आला. मृतदेह काही दिवसापासून पाण्यात असल्यामुळे पाण्यातील जीव जंतूंनी त्या मृत इसमाच्या अवयव खाल्ल्यामुळे मृतदेहाची ओळख पटविणे अवघड झाले आहे सदरील इसम तरुण असल्याचे भासत आहे. सहा साठी पोलीस प्रशासने मृतदेह उतर तपासणीसाठी पाठवला आहे वैद्यकीय अहवाल आल्यानंतरच कळेल सदरील मृत्यू कशामुळे झाला आहे
तसेच सदरील विहिरीच्या बाजूने जाणाऱ्या रोडवरती दररोज हजारो नागरिकांची वर्दळ असते त्याच ठिकाणी दारूची दोन ते तीन दुकाने असल्यामुळे सकाळी आठ वाजल्यापासूनच दारू पिणारे लोक रस्त्यावरच धिंगाणा करतात व शिवीगाळ करत उभे राहतात तसेच आजूबाजूला अनेक डॉक्टरांची दवाखाने आहेत तेव्हा तेथून इजा करणाऱ्या महिलांना रुग्णांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे सदरील दारू अड्डे पूर्णा शहरातून इतरत्र हलवावे अशी मागणी जनतेतून होत आहे
Discussion about this post