मानोरा प्रतिनिधी /विशाल मोरे
मानोरा : तालुक्यातील गव्हा येथील शेतकरी रविंद्र डुकरे यांच्या ६ एकर शेतामधील महाबीजच्या तुरीच्या झाडाला शेंगाच न लागल्यामुळे नुकसान भरपाई देण्याची मागणी पिडीत शेतकऱ्यांनी केली आहे.
सविस्तर असे की, गव्हा येथील शेतकरी रविंद्र डुकरे व इतर दोन शेतकऱ्यांनी खरेदी विक्री संघातून महाबीज कंपनीची तूर खरेदी केली होती. या शेतकऱ्यांच्या शेतातील तूर पिक हिरवेगार उभे असुन झाडाला शेंगाच न लागल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे. या तूर पिकांची पाहणी कृषि पर्यवेक्षक सवने यांच्यासह इतरांनी केली असुन पिडीत शेतकऱ्याकडून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जात आहे.
Discussion about this post