प्रशांत टेके पाटील ( कोपरगाव तालुका प्रतिनिधी ) — यंदाच्या रब्बी हंगामात निसर्ग बळीराजाची कसोटी पाहत आहे. कारण जेव्हापासून रब्बी हंगामातील कांदा गहू ज्वारी हरभरा आदी पिकांची पेरणी झालेली आहे तेव्हापासून सातत्याने निसर्गाच्या लहरीपणामुळे ढगाळ हवामान पहावयास मिळत आहे. त्यामुळे सर्व पिकांवर काळा मावा पिवळा मावा तुडतुडे आदींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेला आहे त्यामुळे पिकांची परिस्थिती खराब होऊन शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होण्याचा धोका निर्माण झालेला आहे.
जागतिक हवामान बदलामुळे निसर्गाचा समतोल बिघडलेला आहे आता बाराही महिने ढगाळ हवामान निर्माण होते आहे तर काही ठिकाणी अवकाळी पाऊसही होऊन शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर नुकसान होते आहे तसेच काही ठिकाणी गारपिट झाल्यामुळे द्राक्ष डाळिंब बागांचे , खरबुज,टरबुजाच्या शेतीचे आणि कांदा, गहू ,हरभरा , मका तसेच भाजीपाला आदी पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान होताना दिसते आहे. या ढगाळ हवामानामुळे सर्व पिकांवर मोठ्या प्रमाणावर रोगराईचा प्रादुर्भाव होतो.
नांगरणी पासून पेरणीपर्यंतचा वाढत चाललेला खर्च महाग होत जाणारे खते कीटकनाशके बी बियाणे आधी सर्वांवर मोठ्या प्रमाणावर खर्च करून उभी केलेली पिके या ढगाळ हवामानामुळे मनात मुळे तयार होणाऱ्या गोराई व किडींपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांना महागाचे कीटकनाशके आणून फवारणी करण्यासाठी नेहमीच सज्ज राहावे लागते.
या सर्व रोगराईपासून पिकांना वाचवून प्रचंड प्रमाणात होणाऱ्या खर्चाचा मेळ घालणे शेतकऱ्यांच्या नाकी नऊ येऊ लागले आहेत. हा सर्व उपद्रव एखाद्या वर्षीच येतो असे नाही तर आता दरवर्षीचा हा अनुभव शेतकऱ्यांना मिळत असतो. शेती एवढ्या मोठ्या प्रमाणावर खर्च करून परवडतही नाही
आणि पडीतही पडून देता येत नाही अशी द्विधा मनस्थिती आता शेतकऱ्यांच्या मनाची घालमेल करताना दिसत आहे. सर्व कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी शेतकऱ्यांच्या हाती शेती हा एकमेव उद्योग असल्यामुळे त्याला शेती करणे भाग आहे परंतु आसमानी आणि सुलतानी अशा दोन्हीही संकटामुळे शेतकरी अतिशय मेटाकुटीला आलेला आहे.
Discussion about this post