दि. २७ ……………………………….महा ई-सेवा केंद्र व आधार संघटना तालुकाध्यक्षपदी प्रमोद वराडे व सचिवपदी भारत दराडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.महा ई-सेवा केंद्र व आधार संघटनेची बैठक येथील विश्राम गृहावर पार पडली.
महा ई-सेवा केंद्र व आधार केंद्र संचालकांना येणाऱ्या अडीअडचणींचे निराकरण करणे, जनतेला विविध प्रकारचे दाखले तातडीने मिळण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करणे,
त्याचप्रमाणे अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी ही संघटना काम करणार आहे.बैठकीला बुलढाणा येथील महेश देवरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी सर्वानुमते संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी प्रमोद वराडे व सचिव म्हणून भारत दराडे यांची निवड करण्यात आली. त्याचप्रमाणे उर्वरित कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्षपदी पंढरी वाघ, कार्याध्यक्ष विजय खेत्रे,
सहसचिव संदीपकुमार राठोड, कोषाध्यक्ष अमोल मंडोरा, सदस्य सुनील डोळे, गजानन मापारी, गजानन क्षीरसागर, आशिष चव्हाण, गणेश कुटे, सुभाष मोरे, जयदेव तिरके, सल्लागारपदी श्रीराम गायकवाड यांची निवड करण्यात आली.
Discussion about this post