आनंदवाडी तांडा येथे जगदंबा देवी यात्रा उत्साहात.
दिवटे प्रतिनिधी:-
शेवगाव तालुक्यातील आनंदवाडी तांडा (दिवटे) येथे जगदंबा माता यात्रा उत्साहात पार पडली.
यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गावकऱ्याबरोबरच पंचक्रोशीतील ग्रामस्थ या यात्रेत मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.
आनंदवाडी तांडा (दिवटे) हे गाव १ हजार लोकसंख्येचे गाव असून, गावात जगदंबा मातेचे मंदिर आहे.
दरवर्षी आषाढ महिन्यात ग्रामस्थ जगदंबा माता यात्रा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करतात. यानिमित्त गावातून गोदावरी नदीतून आणलेल्या कावडीच्या पाण्याची मिरवणूक काढण्यात आली.
यानंतर संध्याकाळी जय सेवालाल नटरंगी नार आर्केस्ट्रा चा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
Discussion about this post