सततच्या पावसामुळे पूर्व भागातील पिके धोक्यात.
सारथी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
दिवटे प्रतिनिधी :-
गेले आठ-दहा दिवस पडत असलेल्या सततच्या भिज पावसामुळे पूर्व भागातील आधोडी, दिवटे,शोभा नगर, लाड जळगाव आदि गावातील खरिपाच्या पिकांना सततच्या ढगाळ वातावरणामुळे ग्रासले आहे. व सूर्याचे दर्शन होत नसल्याने खरीप पिकावर मावा, तुडतुडे पडून पिकाचे नुकसान होईल अशी भीती शेतकरी वर्गातून ऐकावयास मिळत आहे चालू वर्षाचा हंगाम बऱ्यापैकी दिसून येत असला तरी शेतकऱ्याच्या दृष्टीने विचार करायला लावणार आहे'
कारण शेतातील पिकासाठी पडत असलेला पाऊस योग्य असला तरी अजून तालुक्यात मोठा पाऊस न झाल्याने नदी नाले भरल्याने विहिरींना देखील पाणी वाढलेले दिसून येत नाही. शेतकऱ्यांना प्रत्येक वर्ष कोणत्या ना कोणत्या मार्गाने हानिकारक ठरत असल्याने शेतकरी हतबल झाल्याचे दिसून येत आहे. कारण शेतातील अंतर्गत मशागती करण्यासाठी मजुरांचा अभाव असतानाही शेतकऱ्यांनी मजुरांना मागेल ती रोजंदारी देऊन शेतातील कामे उरकून घेतली आहेत.
Discussion about this post