प्रतिनिधी – किशोर आसाराम काळे
छञपती संभाजीनगर -पैठण
पाचोडला होणार 60 खाटाचे उपजिल्हा रुग्णालय
खासदार संदिपान भुमरे यांच्या पाठपुराव्याला यश
पैठण- खासदार संदिपान भुमरे यांनी त्यांचे मूळ गाव असलेल्या पाचोड येथील 30 खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे रुंपातर 50 खाटांचे करण्यास मंजुरी मिळ्याल्याने पाचोड परिसरातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला.तर खासदार संदिपान भुमरे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आसल्याचे माहिती रेणुकादेवी शरद सहकारी साखर कारख्यानेचे चेअरमन मा.सभापती विलास भुमरे यांनी दिली.
याबाबत महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागाने बुधवारी दि 24 शासन निर्णय काढला आहे.या शासन निर्णयान्वये पाचोड येथील 30 खाटाचे ग्रामीण रुग्णालय 50 खाटाचे उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्यास विशेष बाब म्हणुन मान्यता देण्यात आली आहे
हे रुग्णालय झाल्यानंतर पाचोड सह आजुबाजुच्या परिसरातील आनेक गावांतील रुग्णांना रुग्णसेवेचा लाभ घेता येणार आसल्याचे चेअरमन विलास भुमरे यांनी सांगितले .
पैठण प्रतिनिधी – किशोर आसाराम काळे 9890464417
Discussion about this post