पत्रकार भारत कवितके.
भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम.
बोरीवली सुकर वाडी एसटी स्थानकाच्या आवारात चक्क मुले किक्रेट खेळतात, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहे,या एसटी स्थानकात दिवस रात्र प्रवाशांची जा ये चालू असते, स्थानकांच्या आवारात मुले खेळताना त्यांचा चेंडू महिलाना वृध्दांना,व इतर प्रवाशांना लागतो, वेदना ने प्रवाशी कण्हतो, वेळ प्रसंगी चक्कर येऊन खाली पडतो,या वेळी खेळाणारी मुले एकत्र येऊन प्रवाशांनाच दमदाटी करतात, मध्ये कशाला आला,
म्हणून अंगावर धावून जातात, तसेच तेथील शौचालय च्या बाजूला बाहेरील रिक्षा,चार चाकी व इतर खाजगी वाहने अस्ताव्यस्त पार्किंग करुन वाहन चालक शौचालय कडे जातात, त्यांच्या ही वाहनांची काच चेंडू मुळे फुटते,मुले व चालक यांच्या मध्ये जोरदार बाचाबाची होऊन वेळ प्रसंगी मारामारी ही होत असते, बाजूला असलेल्या शेड मध्ये प्रवाशांपेक्षा गर्दुल्ले, दारुडे, भिकारी, बेवारस लोकांनी कायम स्वरुपी आश्रय घेतलेला आढळून येतो.हे लोक प्रवाशांना तिथे धारा देत नाहीत,तिथे थांबू देत नाही,
येथील स्थानिक राज्य परिवहन महामंडळ या कडे दुर्लक्ष करीत असताना दिसते, या ठिकाणी दोन सुरक्षा रक्षक ड्युटीवर असताना ही तेथील या सर्व समस्या कडे दुर्लक्ष केले जाते.खेळणारी मुले,शेड मधील प्रवाशां व्यतिरिक्त इतर लोक व त्यापासून प्रवाशांना होणारा त्रास तेथील सुरक्षा रक्षकांनी लक्ष देऊन कमी करावा, अन्यथा येथे प्रवाशांच्या रागाचा कधी उद्रेक होईल. हे सांगता येणार नाही.याची सर्व जबाबदारी तेथील राज्य परिवहन महामंडळाच्या प्रशासनाकडे व तेथील कर्तव्यावर असलेल्या सुरक्षा रक्षक यांचे वर राहील.असे मुंबई कांदिवली पश्चिम येथील पत्रकार भारत कवितके यांनी सांगितले आहे.
Discussion about this post