कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी किशोर जासूद
हातकणंगले येथील मुख्य हायवेवरील बसस्थानक चौकात होणाऱ्या प्रचंड वाहतूक कोंडीचे तात्काळ नियोजन करा. लोकांची गैरसय होता कामा नये , अशा सूचना देत नवनिर्वाचित आमदार दलितमित्र अशोकराव माने बापूंनी आज प्रशासनाला चांगलेच धारेवर धरून दम भरला* .
सांगली -कोल्हापूर मार्गावर हातकणंगले बस स्थानक चौकात गेली अनेक दिवस ऊस वाहतूक व रस्त्याची झालेली दयनीय अवस्था यासह अतिक्रमणामुळे अनेक कारणांनी प्रचंड गर्दी होत असून नागरिकांना याचा नाहक त्रास होत आहे. ही बाब लक्षात येताच आमदार अशोकराव माने बापूंनी आज सकाळी स्वतः जागेवर जाऊन प्रशासनाला तात्काळ यातून मार्ग काढत वाहतूक नियंत्रकासह मुख्य हायवे समोरील पंचायत समिती ऑफीस ते इचलकरंजी फाटा येथे नेहमी होणारा वाहतूक अडथळा दूर करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी प्रशासनासोबत चर्चा करून अतिक्रमण,पार्किंग शिस्त,हायमास्ट, डिव्हायडर तसेच संध्याकाळी वाहतूक सुरळीत करण्यासाठी ट्रॅफिक हवालदार उभा करणे व नागरिकांची हेळसांड थांबवावे अशाही सूचना आमदार माने यांनी दिल्या.
यावेळी पोलीस निरीक्षक शरद मेमाणे,एन एच ए आय चे अधिकारी महेश पाटोळे ,बांधकाम विभाग उपकार्यकरी अभियंता शिवाजी पाटील,तहसीलदार प्रतिनिधी फड सर, मुख्याधिकारी विशाल पाटील यांसह भाजपा तालुकाध्यक्ष अमरसिंह पाटील,नगरसेवक राजू इंगवले,स्वीय सहायक सुहास राजमाने,रमजान मुजावर,दीनानाथ मोरे,मयूर कोळी,उमेश सूर्यवंशी,मनोज इंगवले,गुंडू जाधव, प्रवीण कोळी,प्रकाश स्वामी यांसह हातकणंगले नगरी मधील प्रमुख नेते,कार्यकर्ते,नागरीक व पत्रकार बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.


Discussion about this post