

नानीबाई चिखली, ता. २९: सर पिराजीराव घाटगे यांच्या १४९ व्या जयंतीनिमित्त येथील श्रीमंत जयसिंगराव घाडगे क्रीडा संकुलमध्ये विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले आहे. २९ डिसेंबर ते ३ जानेवारीअखेर होणाऱ्या या स्पर्धा सर पिराजीराव घाटगे शारीरिक शिक्षण धर्मादाय न्यास, कोल्हापूर यांच्या वतीने होणार आहेत. विजेत्यांना रोख रकमेबरोबरच पिराजीराव घाटगे चषक देण्यात येणार आहे.
रविवार (ता. २९) ३५ किलो वजनी गटातील जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा होणार असून, अनुक्रमे ७०००, ५०००, ३००० व २००० रुपये अशी बक्षिसे देण्यात येणार हेत. सोमवारी (ता.३०) धावण्याच्या स्पर्धा होणार आहेत.
मुलांसाठी १६०० मीटर, तर मुलींसाठी ८०० मीटर धावणे स्पर्धा होणार आहेत. यावेळी दोन्ही गटांतील विजेत्यांना अनुक्रमे ३०००, २०००, १००० व ५०० रुपये बक्षीस आहेत.
बुधवारी (ता.१) कागल तालुका मर्यादित मुलांच्या खुल्या गटातील कबड्डी स्पर्धा होणार आहेत. गुरुवारी (ता. २) ५० किलो वजनी गटातील मुलींच्या कबड्डी स्पर्धा होणार आहेत. दोन्ही गटांतील विजेत्यांना अनुक्रमे १५०००, ११०००, ७००० व ५००० रुपये अशी बक्षिसे आहेत.
अधिक माहितीसाठी घाटगे क्रीडा संकुल चिखलीचे क्रीडा व्यवस्थापक बी. आर. तुकान,अमित काईत,नंदकुमार घाटगे, यांचे शी संपर्क साधावा.
Discussion about this post