निवघा बा प्रतिनिधी देवानंद महाजन दि 28/12/2024
भारतीय जनता पार्टी निवघा बा सर्कलमध्ये सदस्य नोंदणी अभियान कार्यशाळा संपन्न झाली
आज हदगाव हिमायतनगर तालुक्यातील निवघा बा सर्कल मध्ये भारतीय जनता पार्टी च्या वतीने सदस्य नोंदणी अभियानाची कार्यशाळा आयोजित केली होती या कार्यशाळेत तालुक्याचे तालुका अध्यक्ष सन्माननीय तातेराव पाटील वाकोडे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान ग्रहण केले आणि भारत मातेचे पुष्पक पुष्पहार घालून पूजन केले तसेच सन्माननीय व्यंकटेश लोणी आणि श्रीकांत हनवते सर यांनी सदस्य नोंदणीची कशी करावी या संदर्भात सर्व सर्कलमधील भूत अध्यक्षांना सदस्य नोंदणी करण्याचे मार्गदर्शन केले
आणि प्रत्येक बूथप्रमुखांना शंभर सदस्य नोंदणी करण्याचे आव्हान केले आहे उपस्थित सर्व सर्कलमधील भूत अध्यक्ष यांना मोलाचे मार्गदर्शन माननीय लोणे सर यांनी केले आहे उपस्थित माननीय तालुका अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सदस्य नोंदणी संयोजक बरेच कार्यकर्ते उपस्थित होते अशा प्रकारे निवघा बाजार येथे सदस्य नोंदणी अभियान कार्यशाळा संपन्न झाली आहे
Discussion about this post