पुणे जिल्हा:तालुका विज्ञान प्रदर्शनात दत्तात्रय चिकटे यांचा प्रथम क्रमांक
सलग तीन वर्ष प्रथम क्रमांकाचे ठरले मानकरी
वार्ताहर- उ. व. सुकळे
शिरूर- पुणे जिल्हा परिषद शिक्षण विभाग, प्राथमिक, माध्यमिक व पंचायत समिती शिक्षण विभाग, शिरूर यांच्या संयुक्त विद्यमाने ५२ वे शिरूर तालुकास्तरीय विज्ञान, गणित व पर्यावरण प्रदर्शन शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे चांदमल ताराचंद बोरा कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय शिरूर येथे पार पडला.
२७ डिसेंबर व २८ डिसेंबर २०२४ या कालावधी पार पडलेल्या तालुकास्तरीय विज्ञान, गणित व पर्यावरण प्रदर्शन पार पडले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सविंदणे येथील शिष्यवृत्ती तज्ञ, शैक्षणिक क्षेत्रातील आणि विविध पुरस्काराने सन्मानित असलेले आदर्श शिक्षक दत्तात्रय अनंतराव चिकटे यांनी शिक्षक सहाय्यक गटात(1 ते 8 )वैज्ञानिक प्रतिकृती केल्याबद्दल प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल लचके, प्राचार्य डॉ. के. सी. मोहिते, शिरूर गटशिक्षणाधिकारी कळमकर साहेब, विस्तार अधिकारी किसन खोडदे साहेब यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्या या यशाबद्दल तालुक्यातील शिक्षक संघटनेकडून व शिक्षकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
राज्याचे सहकारमंत्री दिलीपरावजी वळसे पाटील, मा.आमदार पोपटराव गावडे, जिल्हा परिषद मा. सदस्य सुनीता गावडे, राष्ट्रवादीचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र गावडे, मा. पंचायत समिती सदस्य अरुणा घोडे, मा. पंचायत समिती सदस्य डॉ. सुभाष पोकळे,दामूशेठ घोडे,शुभांगीताई पडवळ सरपंच सौ. मनीषाताई नरवडे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बाळासाहेब भोर, उपाध्यक्ष प्रदीप पडवळ, केंद्रप्रमुख सखाराम फंड, मुख्याध्यापक रमेश बोखारे, लहू शितोळे, गणेश पवार यांनी अभिनंदन केले.
Discussion about this post