नागभीड तालुक्यातील मोहाळी मोकासा येथील श्रीराम कृषी केंद्राचे संचालक नितीन गजभिये यांचे आज दिनांक 28डिसेम्बर ला पहाटे 4.00 च्या सुमारास अचानक निधन झाले आहे.. अतिशय सक्रिय युवा सामाजिक कार्यकर्ते म्हणुन त्यांची ओळख होती वयाच्या अवघ्या बेचाळीस व्या वर्षी अल्पयुष्यात त्यांचं निधन झाल्याने गावात तसेच मित्र परिवारात हळहळ व्यक्त केली जात आहे..
नितीन गजभिये हे बिकली ग्रामपंचायत च्या संगणक परिचालक स्वेता ताई गजभिये यांचे पती असुन त्यांचे मृत्यू पश्चात पत्नी, लहान मुलगा, आईवडील,भाऊ व दोन बहिणी आहेत… स्वेता ताई गजभिये आनी त्यांच्या परिवारास या आभाळा एवढ्या संकटातून सावरण्यासाठी परमेश्वर शक्ती देवो अशी शोक संवेदना या वेळी तालुका संगणक परिचालक संघटनेच्या वतीने तालुका संगणक परिचालक संघटनेचे अध्यक्ष विजय सोनवाने,सदस्य संजय रामटेके यांनी व्यक्त केली आहे…
Discussion about this post