गणेश राठोड
उमरखेड प्रतिनिधी :
दिनांक २३/१२/२०२४ रोजी वर्षा मारोती ब्रम्हटेके सहायक शिक्षीका त्यांचे पती देवानंद दत्ता बुरकुले,मुलगा धनंजय बहीण आशा भोगे, वडील मारोती ब्रम्हटेके व आई यांच्या विरोधात पोलीस स्टेशन वसंतनगरला अपराध क्रमांक ०५९७/२०२४ कलम ३३३,२९६,३५२,११५ (२) भारतीय न्याय संहिता प्रमाणे दिनांक २३/१२/२०२४ रोजी गुन्हा नोंद झाला आहे. सदरचा गुन्हा हा अतिशय गंभीर स्वरूपाचा गुन्हा असून त्यांच्यावर प्रशासकीय कार्यवाही करून त्यांना निलंबित करण्यात यावे. या व्यतिरीक्त सदर पती-पत्नी यांच्या विरोधात गुन्हे व तक्रार अर्ज पोलीस अभिलेखावर व प्रशासकीय अभिलेखावर प्राप्त आहेत.
दिनांक २०/०६/२०२४ रोजी देवानंद दत्ता बुरकुले, शिक्षक भवानी यांच्या विरोधात सौ. सविता बळी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन वसंतनगरला नॉन कॉंगझेबल ऑफेन्स क्रमांक ०३००/२०२४ कलम ५०४ भादवि प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
दिनांक २१/१२/२०२३ रोजी रूक्मिनीताई भांगे, सहा, शिक्षीक, नवभारत प्राथमिक शाळा, महागाव हयांनी शिक्षीका वर्षा ब्रम्हटेके यांच्या विरोधात तकार अर्ज दिला होता त्यात त्यांना पोलीस तक्रार देवुन त्यांच्याकडुन पैसे घेवुन तक्रार अर्ज निकाली काढतो अशी धमकी दिली आहे.
दिनांक २९/११/२०२३ रोजी शरद रामश्वर पवार सहा. शिक्षक, नवजिवन प्राथमिक शाळा, महागाव यांच्या व त्यांच्या सोबत इतर ४ लोकांच्या विरोधात वर्षा ब्राम्हटेके यांनी तक्रार अर्ज दिला होते की, सहा. शिक्षक शरद पवार यांनी त्यांच्या सोबत प्रेम संबंध प्रस्थापित करून वेळोवेळी ३,४६,८००/- रूपये
खंडणी घेवुन संगणमत करून पैसे मागीतले. व्हिडीओ क्लिप व्हायरल करून, जातीवाचक शिवीगाळ करून, जिवाने मारण्याची धमी देवुन, विनयभंग करून, बदनामी करून, शिवीगाळ केल्याबाबत अर्जा मध्ये नमुद केले होते. त्यात त्यांनी स्वतः कबुल केले की, त्यांचा आणी शरद पवार सरासोबत तिचे प्रेम संबंध होते असे तीने तीच्या तक्रार अर्जामध्ये सांगीतले आहे. सदरचा अर्ज हा अतिशय गंभीर स्वरूपाचा असुन शिक्षकी पेशाला न शोभणारा, नैतीक मुल्यांची पायमल्ली करणार आहे. असे नैतीक अधपतन झालेले शिक्षक काय समाज घडवणार हा मोठा प्रश्न आहे. आणि बालाकांच्या भविष्यासाठी गंभीर बाब आहे.
सदर वादग्रस्त पती-पत्नी यांच्या नावे अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हयाचे तकारी पोलीस रेकॉर्डला प्राप्त आहे. त्याची देखील चिकीत्सक सखोल चौकशी करण्यात यावी
सदर शिक्षक पती-पत्नी यांच्या अक्षम्य अपराधावर संस्था संचालकांनी जाणीवपुर्वक पाघरून टाकलेले आहे. अतिशय गंभीरबाब असुनही त्यांच्यावर आज पर्यंत कोणतीही कार्यवाही संस्था संचालकानकडुन करण्यात आली नाही. यामुळे संस्थेची बदनामी होत आहे. म्हणुन लवकरात लवकर कायदेशीर, प्रशासकीय कार्यवाई करण्यात यावी.
अन्यथा संस्थेच्या विरोधात कायदेशीर मार्गाचा अवलंब करून आंदोलन किंवा आमरण उपोषणाला एस.डी.एम कार्यालाय, उमरखेड येथे बसन्याचे निवेदन मा. शिक्षण मंत्री साहेब तसेच नवभारत प्राथमिक शाळा, महागाव ता. महागांव जि. यवतमाळ , जगत विध्यालय भवानी, ता. उमरखेड जि. यवतमाळ चे अध्यक्ष ,संचालक यांना शाम माधव धुळे, जिल्हा कार्याध्यक्ष, भिम टायगर सेना, यवतमाळ यांनी दिले.
Discussion about this post