पाणी फाउंडेशन अंतर्गत फार्मर कप स्पर्धेतील गटाची बाभूळतेल येथे प्रक्षेत्र भेट
सारथी महाराष्ट्राचा वैजापुर तालुका प्रतिनिधी अनिल सुर्यवंशी
महाराष्ट्रात पाणी फाउंडेशन अंतर्गत जी फार्मर कप स्पर्धा चालू आहे या स्पर्धेतील स्पर्धक गट प्रगतिशील शेतकऱ्यांना भेट देऊन त्यांचे उत्पन्न वाढीचा अनुभव जाणून घेऊन तो कृतीत कसा आणता येईल यासाठी प्रयत्न करीत आहेत.
याच प्रमाणे बळ्हेगाव येथील साई शेतकरी गटा तील दहा सदस्य व चिकटगाव येथील बळीराजा शेतकरी गटा तील दहा सदस्य यांनी बाभूळ तेल येथील प्रगत शेतकरी श्री प्रताप चव्हाण यांच्या तूर प्लॉटला प्रत्यक्ष भेट देऊन तुर पिकाबद्दल बियाणे निवड, रोगांची ओळख, किडीची ओळख, योग्य वेळी योग्य फवारणी, शेंडा खुडणी, आंतरपीके कोणते घ्यायची, आंतर पिकाबद्दल माहिती, आंतर मशागत, पाण्याची योग्य नियोजन, मजुरीचे नियोजन, दोन ओळीतील दोन रोपातील योग्य अंतर अशी लागवडी पासून ते काढणीपर्यंत सर्व नियोजन कमी खर्चात कसे केले चव्हाण काकाकडून जाणून घेतले. तसेच त्यांच्या बेड मल्चिंग वरील मिरची पिकास भेट दिली. सर्वांनी पाणी फाउंडेशन च्या रिवाजा प्रमाणे प्रताप काका चे स्वागत केले.
त्याच गावातील डॉक्टर दारवंटे बोर जातीच्या बंदिस्त शेळीपालनास भेट दिली.
शेतीला जोडधंदा म्हणून शेळीपालन याकडे बघितले जाते. बोर या जातीची निवड, त्यांचे लसीकरण, जागेची निवड, गोठा पद्धत, त्यांचा एका दिवसातला खुराक, त्यांना होणारे आजार व त्यांचे खरेदी व विक्री व्यवस्थापन याची संपूर्ण माहिती डॉक्टर दारवंटे यांनी गटास दिली.
यावेळी साई शेतकरी गटाची सदस्य अनिल सूर्यवंशी, हरिभाऊ सूर्यवंशी, नंदू सूर्यवंशी, गणेश सूर्यवंशी, सुनील सूर्यवंशी, योगेश सूर्यवंशी, संतोष दिवेकर व बाळू सूर्यवंशी,अशोक सूर्यवंशी आणि बळीराजा शेतकरी गटातील सदस्य नानासाहेब घायवट, बाबासाहेब निकम, काकासाहेब मगर, कृष्णा कोकाटे, रमेश जाधव, हरिभाऊ निकम, नानासाहेब निकम, ज्ञानेश्वर निकम, व्यकटेश गायकवाड, गणेश जगताप व व गावातील प्रगत शेतकरी प्रतिष्ठित व्यक्ती या प्रक्षेत्र भेटीस हजर होते.
Discussion about this post