महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष धर्मेंद्र जी सातव साहेब यांच्या हस्ते *फलकाचे अनावरण *.करण्यात आले या प्रसंगी जिल्हा संघटक शरद दिवेकर जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष दिवेकर तालुका अध्यक्ष सोमनाथ लवांडे तालुका उपाध्यक्ष अनिल शिंदे तालुका दक्षिणउपाध्यक्ष बाप्पू बेंगारे तालुका महिला अध्यक्ष दिव्या ढमे दादा ढमे सदाभाऊ जगताप व कौठडी शाखा अध्यक्ष आबा आटोळे उप अध्यक्ष राजु शेख इतर दिव्यांग होते मार्गदर्शन करताना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष
धर्मेंद्र सातव आपल्या भाषणांमधून बोलत असताना असे म्हणाले की दिव्यांग सर्व प्रकारच्या प्रवर्गाला शासनाच्या योजनेचा लाभ मिळवून देण्याचे काम तालुका पातळीवर आणि जिल्हा पातळीवर मोठ्या जोमाने चालू आहे.
कुठल्याही प्रकारच्या अडचणी जर येत असतील तर मोठ्या संख्येने दिव्यांगाच्या हक्कासाठी आंदोलनाच्या माध्यमातून आपण रस्त्यावर उतरू आणि दिव्यांगांना न्याय मिळवून देऊ असे राज्य अध्यक्ष धर्मेंद्रजी सातव साहेब यांनी सांगितले महाराष्ट्रातल्या प्रत्येक गाव तालुका संघटनेच्या पाठीमागे उभे राहू भले तेथे कुठलीही वेळ आली तरी चालेल कारण 2012 पासून संघटनेमध्ये संघर्ष करत आलो आहोत आणि त्या संघर्षाला कायमस्वरूपी यश आले असे त्यांनी आपल्या भाषणाच्या माध्यमातून दिव्यांगांना चांगल्या प्रकारचे मार्गदर्शन केले यावेळी गावचे सरपंच उपसरपंच.विविध संस्थेचे पदाधिकारी तसेच.प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हा पदाधिकारी तालुका पदाधिकारी कौठडी गाव कार्यकारणी सर्व दिव्यांग बंधू-भगिनी ग्रामस्थ महिलावर्ग उपस्थित राहिल्याबद्दल प्रहार संघटनेच्या वतीन मनःपूर्वक आभार
Discussion about this post