प्रतिनिधी निलेश सुर्वे हिंगोली .. अनोळखी मृत महिलेची ओळख पटवून आरोप तेलंगणा राज्यातून आरोपी ताब्यात.. औंढा नागनाथ तालुक्यातील वगरवाडी शिवारात खून झालेल्या तरुणीच्या मृतदेहाची परिसरात सापडलेल्या डी मार्टच्या एका पावतीवरून हिंगोली पोलिसांनी गुन्ह्यांची उकल करून आरोपीला तेलंगणा मधील आदिलाबाद येथून ताब्यात घेतल्याची माहिती हिंगोली पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी रविवारी दि 29 ला पत्रकार परिषदेत दिली आहे. सदरील खून हा लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये झालेला आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत गुन्हे शाखेचे निरीक्षक विकास पाटील, औंढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहिरे उपस्थित होते.
यावेळी कोकाटे यांनी सांगितले की पाच दिवसापासून औंढा पोलीस व गुन्हे शाखेचे पोलीस पथक तरुणीची ओळख पाटवण्याचे प्रयत्न करत होते यावेळेस त्यांना दि 28 शनिवारला घटना घडलेल्या परिसरात एक डी मार्ट ची पावती मिळाली त्यावरील काही माहितीच्या आधारे पोलिसासांनी अहिल्यानगर जिल्यातील जामखेड येथे जाऊन तरुणीची ओळख पटवली. सदर मुलगी अकला बेद्रे समजल्यानंतर हिंगोली गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक विकास पाटील, जि. एस. राहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथके तयार केली. या पथकाने अधिक माहिती घेतल्यानंतर एक तरुण मागील 9 महिन्यापासून तिच्या सोबत रिलेशनशिप मधे होता अशी माहिती पोलिसांना मिळाली त्या तरुणाची माहिती घेतली असता तॊ नांदेड जिल्यातील मुगट येथील श्रीकांत पिनलवार (24)असल्याचे स्पष्ट झाले.
त्यानंतर त्याला आदिलाबाद आदिलाबाद येथून पोलिसांनी ताब्यात घेतले. दोघांची प्रवासात ओळख झाली. दाट मैत्री केली, मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. व मागील 9 महिन्यापासून ते लिव्ह इन रिलेशनशिप मधे राहत होते. 25 तारखेला त्याचा वाद झाला. त्यानंतर आरोपीने तिचा गळा दाबून खून केला व तिचा मृतदेह बॅगमधे भरून तॊ वगरवाडी शिवारात फेकून दिला व तॊ नांदेडला गेल्याचे पोलिसांनी सांगितले.
Discussion about this post