आज ३१ डिसेंबर पाहता पाहता २०२४ चा सूर्य आज उजाडून मावळतीकडे जाईल आणि एक नवीन पहाट नव्या संकल्पांसह उजाडेल. आज थर्टी फर्स्ट निमित्ताने सांगली मिरजेतील हॉटेल्स आणि ढाबे खवय्यांचे चोचले पुरवण्यासाठी सज्ज झाली आहेत तरुणाई मध्ये जल्लोषी वातावरण आहे. हा जल्लोष इन कॅश करण्यासाठी विविध हॉटेल्स आणि रिसॉर्ट मध्ये डी जे पार्ट्यांचे आयोजन केले गेले आहे. काही ठिकाणी खळगी फार्म हाऊस सामूहिक कॉकटेल पार्टीसाठी सज्ज आहेत. तर काही सामाजिक संघटना या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी रस्त्यावर हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणाई ला प्रबोधनही करताना दिसत आहेत सांगलीत दारू नको दूध प्या हा उपक्रम राबवला जात आहे. तर आज रात्री मद्यपान करून रस्त्यावर हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणाई वर पोलीस प्रशासनाची करडी नजर असणार आहे. राज्य उत्पादन शुल्क ची सहा भरारी पथके अवैध गोवा मेड विदेशी मद्य वाहतुकीवर लक्ष ठेऊन असणार आहे. तर जिल्हा पोलीस प्रशासन कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सज्ज आहे. पंढरपूर रस्त्यावरील हॉटेल ढाबे हि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी सज्ज आहेत विविध ठिकाणी आकर्षक पॅकेज ठेवण्यात आली आहेत. हॉटेल परिवार चे चालक ओंकार पाटील म्हणाले आमच्याकडेही सरत्या वर्षाला निरोप दिला जाईल आणि नवीन वर्षाचे स्वागत होईल मात्र कायदा आणि सुव्यवस्था तसेच प्रशासनाने नेमून दिलेल्या वेळेमध्ये आम्ही आमची ग्राहक सेवा करणार आहोत. तर मिरची हॉटेल चे नाजीर शेख म्हणाले कि आमच्या हॉटेल मध्ये आज आमच्या चोखंदळ ग्राहकांसाठी शाकाहारी मांसाहारी पद्धतीच्या असंख्य व्हरायटी नेहमीप्रमाणे असणार आहेत
Discussion about this post