महसूल आणि इतर विभागातील लाचलुचपतीची प्रकरणे आपल्याला नवीन नाहीत मात्र या रोगाचा आता शैक्षणिक क्षेत्रामध्येही होऊ लागला आहे याचा प्रत्यय नुकताच मिरजेतील नामांकित शिक्षण संस्था असलेल्या दि हिंद एज्युकेशन संस्थेमध्ये पहायला मिळाला. हे प्रकरण आहे नोव्हेंबर महिन्यातले. तक्रारदाराची थकीत पगाराची रक्कम रु १९ लाख मिळवून देण्यासाठी सहा टक्क्याच्या हिशोबाने संस्थेच्या नरवाड गावच्या शाळेमधील शिक्षकाने चक्क एक लाख एकोणीस हजारांची लाच तक्रारदाराकडे मागितली. शिक्षक उमेश मारुती बोरकर (रा. यादव गल्ली,कवठेएकंद ता मिरज) याने याच संस्थेच्या सोनी गावातील शाळेत लिपिक पदावर काम करणाऱ्या युवराज मनोहर कांबळे (रा बौद्ध वसाहत बेडग ता मिरज) याच्या साथीने हि लाच मागितली. याबाबत लाचलुचपत विभागामधून मिळालेली माहिती अशी. तक्रारदार यांची पत्नी सांगली मधील दोन महाविद्यालयांमध्ये संस्कृत विषय शिकवण्यासाठी अर्धवेळ शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. दोन्ही महाविद्यालयांमधील दोन वर्षांचे एकूण १९ लाख ४५ हजार ७१० रु येणे बाकी होते. महाविद्यालयाने तीन पगाराची बिले मंजुरी साठी जिल्हा परिषद शिक्षण अधिकारी यांचे मार्फत जिल्हाधिकारी कार्यालयातील पे युनिट कडे पाठवली होती तक्रारदार यांच्या पत्नी या थकीत पगाराच्या बिलांसाठी या कार्यालयात पाठपुरावा करत असताना शिक्षक उमेश बोरकर संपर्कात आले त्यांनी या बिलाची रक्कम मिळवून देतो असे सांगून एक लाख १९ हजार इतक्या लाचेची मागणी तक्रारदार यांच्या पत्नीकडे केली याबाबत तक्रारदार यांनी नोव्हेंबर १४ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय सांगली यांचेकडे तक्रार अर्ज दिला या तक्रार अर्जानुसार पडताळणी केली असता शिक्षक उमेश बोरकर याने अधीक्षक कारमुसे आणि लिपिक यांना सांगून रक्कम मिळवून देतो असे सांगितल्याचे निष्पन्न झाले त्यावेळी लिपिक कांबळे हा या मागणी वेळी उपस्थित होता व त्याने तक्रारदार याना लाच देण्यासाठी प्रोत्साहित केले मात्र या उमेश बोरकर याने लाच स्वीकारली नाही मात्र लाच मागणी केली त्याबद्दल दोघांवर गुन्हा दाखल करण्यासाठी वरिष्ठांकडे अहवाल या विभागाने पाठवला होता परवानगी मिळताच शिक्षक बोरकर आणि लिपिक कांबळे याना लाचलुचपत विभागाने अटक करून विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा नोंद करण्यात आला पोलीस उपनिरीक्षक उमेश पाटील अधिक तपास करत आहेत
Discussion about this post