पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्यावतीने घेतलेल्या क्रीडामहोत्सवात सांघिक आणि वैयक्तिक क्रीडाप्रकारात आकुर्डी गटातील शाळांनी सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. सासवड येथील वाघिरे महाविद्यालयाच्या प्रांगणात दोन दिवस झालेल्या स्पर्धांमध्ये जिल्ह्याच्या विविध शाळांतील सुमारे साडेतीन हजार विद्यार्थी खेळाडूंनी जीगरबाज खेळी करीत उपस्थितांची मने जिंकली. संस्थेतील विविध विद्यालयांच्या वाघोली, खानापूर, आकुर्डी, ओझर, पौड, निमगाव केतकी, सुपे, नसरापूर, न्हावरे असे नऊ गटात कबड्डी, खो-खो, व्हॉलिबॉल, या सांघिकसह अॅथलेटिक्सच्या स्पर्धा झाल्या. यामध्ये संस्थेच्या सर्व शाखांमधील सुमारे 15 हजार खेळाडू सहभागी झाले होते. गटस्तरावर प्रथम क्रमांक मिळविलेले विद्यार्थी जिल्हास्तरीय स्पर्धेत खेळले. सासवड येथील वाघिरे महाविद्यालयाच्या क्रिडांगणावर दोन दिवस सांघिक आणि वैयक्तिक स्पर्धांचा थरार पहायला मिळाला. अनेक खेळाडूंची चमकदार खेळी, डाव टाकण्याच्या पद्धती, सांघिक एकात्मतेची उपस्थितांनी वाहवा केली.
विविध स्पर्धातील विजेत्या, उपविजेत्या मुले आणि मुलींची गटनिहाय नावे पुढीलप्रमाणे
14 वर्षे वयोगट – 100 मीटर धावणे – मुले – विनय सिंग (चऱ्होली), सूरज पवार (केसनंद). मुली – पूर्वा कोळेकर (संविदणे), ओवी भोयणे (पौड). 200 मीटर धावणे – मुले – विनय सिंग (चऱ्होली), प्रथमेश गुंतवळे (खराडी). मुली – पूर्वा कोळेकर (संविदणे), शुभांगी राठोड (वडगावशेरी). 400 मीटर धावणे – मुले – चैतन्य माळी (आकुर्डी), हर्षद बेर्डे (केसनंद) .मुली – समृद्धी केदारी (बोरी), नम्रता पटेकर (चऱ्होली). 600 मीटर धावणे – मुले – हरीओम कश्यप (मुठा), शहादेव बेर्डे (केसनंद) मुली – वृषाली मधे (येणेरे), आकांक्षा खंडागळे (न्हावरे). लांब ऊडी – मुले- मानस पाटील (वाघोली), सूरज गुप्ता (मुंढवा). मुली – सई रांजणे (सूपा), पूर्वा केळेकर (संविदणे). 4 बाय 100 मीटर रिले – मुले – वेल्हे, मुली – न्हावरे. कबड्डी – मुले – संविदणे, शिरोली, मुली – संविदणे, चऱ्होली. व्हॉलीबॉल – ओझर, चऱ्होली (मुले आणि मुली दोन्हींमध्ये) .खो खो – मुले – निमगाव केतकी, शिंद, मुली – शिंद, डाळज
17 वर्षे वयोगट – 100 मीटर धावणे – मुले – साहिल कोंढरे (घोटावडे), प्रत्यय देशमुख (आकुर्डी) मुली – प्रिया मरगज (आकुर्डी), आर्या ढेकाणे (नसरापूर). 200 मीटर धावणे – मुले – निखिल चव्हाण (शिंद), आर्यन जागडे (पानशेत) मुली – प्रिया मरगज (आकुर्डी), चैत्राली लोंढे (डाळज). 400 मीटर धावणे – मुले – आदित्य कुरकुटे (संविदणे), आर्यन खवळे (संविदणे). मुली – सोनल भालेकर (येणेरे), विनीता पटेल (मुंढवा) 800 मीटर धावणे – मुले – चिराग हांडे (उंब्रज), आदित्य कुरकुटे (संविदणे). मुली – रूबी सोनगर (खराडी), साक्षी सगर (वडगावशेरी).
1500 मीटर धावणे – मुले – ज्ञानेश्वर यमगर (सासवड), चिराग हांडे (ओझर) मुली – विनिता पटेल (मुंढवा), साक्षी चव्हाण (मावडी). लांब ऊ़डी – मुले – झुबेर काझी (नसरापूर), निखिल चव्हाण (नसरापूर). मुली – प्रिया मरगज (आकुर्डी), आर्या ढेकाणे (नसरापूर). गोळा फेक – मुले – अमन शेख (वाघोली), आयुष पवार (पौड). मुली – लावण्या लंघे (न्हावरे), नम्रता काशिद (वाघोली). 4 बाय 100 मीटर रिले – मुले – न्हावरे, मुली – उरळगाव. कबड्डी – मुले – चऱ्होली, वडगाव शेरी, मुली – शेलपिंपळगाव, मुंढवा. व्हॉलीबॉल – ओझर, चऱ्होली (मुले आणि मुली दोन्हींमध्ये). खो खो – मुले – सुपे, शिंद, मुली – पांडेश्वर (भागशाळा), वाघोली.
19 वर्षे वयोगट – 100 मीटर धावणे – मुले – समर्थ मोठे (आकुर्डी), कार्तिक दळवी (सासवड). मुली – नम्रता काशिद (हडपसर), अक्षदा शिंदे (ओतूर). 200 मीटर धावणे – मुले – समर्थ मोठे (आकुर्डी), सम्युअल गायकवाड (आकुर्डी), मुली – ऋषिका कांबळे (पौडरोड), अंकिता लायगुडे (पौड). 400 मीटर धावणे – मुले – यश मोरे (सासवड), सईराज सुपेकर (ओतुर). मुली – श्रावणी जगताप (मांडकी), अक्षदा शिंदे (ओतूर). 800 मीटर धावणे – मुले – यश महाले (नसरापूर), शंकर बारे (ओतुर). मुली – नम्रता काशिद (हडपसर), श्रावणी जगताप (मांडकी). 1500 मीटर धावणे – मुले – यश महाले (नसरापूर), अमोल गर्जे (ओतुर). मुली – नुतन जगताप (मांडकी), रूपाली वानखेडे (ओतुर).
लांब ऊ़डी – मुले – अनुज पांगारे (नसरापूर), ओम साळवे (ओझर). मुली – अक्षदा शिदे (ओझर), प्रतिक्षा घोरपडे . गोळा फेक – मुले – संस्कार भोंडवे (सुपे), कुंडलिक मासाळ (वाघोली). मुली – श्रावणी हांडे (ओझर), निकीता सुळके (सूपे). थाळी फेक – मुले – गौरव नाणेकर (कामशेत), रोहीत कळसकर (खडकी). मुली – सृष्टी नगरे (डाळज), सिद्धी राऊत (वेल्हे). 4 बाय 100 मीटर रिले – मुले – सासवड, मुली – पौडरोड. कबड्डी – मुले – न्हावरे, वेल्हे. मुली – ओतुर, नसरापूर. व्हॉलीबॉल – मुले – ओझर, चऱ्होली. मुली – ओझर, हडपसर. खो खो – मुले – पिरंगुट, निमगाव केतकी. मुली -सूपे आणि कळस.. महाविद्यालयीन गट – कबड्डी – आकुर्डी, हडपसर (दोन्हींमध्ये), व्हॉलीबॉल – मुले – हडपसर, आकुर्डी. मुली – आकुर्डी, हडपसर, खो खो – आकुर्डी, हडपसर (दोन्हींमध्ये).
संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव ॲड. कदम, खजिनदार ॲड.मोहनराव देशमुख, उपसचिव एल.एम.पवार, सहसचिव ए.एम.जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली रजिस्ट्रार सिताराम अभंग, अधिक्षक किरण देशपांडे, विशेष कार्यकारी अधिकारी प्रमोद जाधव, अकाऊटंट गोरख सोंडकर, क्रिडा विभागाचे समन्वयक डॉ.योगेश पवार, शाम भोसले, संतोष पठारे, आदिनाथ पाठक, सासवड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पंडीत शेळके, शेठ गोविंद रघुनाथ साबळे फार्मसी महाविद्यालयाच्या प्राचार्या राजश्री चव्हाण तसेच विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, शाळांचे मुख्याध्यापक, क्रीडाशिक्षक यांनी या स्पर्धेचे नियोजन केले होते.
Discussion about this post