अचलपूर मतदार आमदार संघाचे नवनर्वाचित आमदार श्री प्रवीण तायडे यांनी श्री क्षेत्र पाचवड देवस्थान जालना पूर येथे भेट दिली. आचार्य श्री लोणारकर मोठे बाबा जाळीचा देव त्यांच्या आश्रमातील भिक्षूक मंडळी सहित दिनांक 25.11.2024 पासून ते 6.1. 2025 पर्यंत पाचवड देवस्थान जालनापूर येथे वास्तव्य आहे. सर्वप्रथम आमदारांनी पाचवड देवस्थान येथे श्री गोविंद प्रभूंच्या स्थानांचे दर्शन घेतले, त्यानंतर प. पु. प. म.आचार्य श्री लोणारकर मोठे बाबा आणि जालनापुर येथील भाजपच्या कार्यकार्यांकडून माननीय आमदारांचे स्वागत समारंभ करण्यात आला. त्यानंतर आचार्य श्री मोठेबाबा यांच्यासोबत आमदारांनी हितगुज साधले. अचलपूर मतदारसंघातले शेवटचे गाव म्हणून ओळखले जाणारे जालनापूर गावातील ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्या समस्येचे निराकरण करण्याचे आश्वासनही आमदार यांनी दिले. याप्रसंगी प.पु. प्रवीण दादा लोणारकर, बी.बियाणे महा मंडळ अध्यक्ष प्रमोदराव कोरडे,कांतीलाल सावरकर, महेंद्र आमले, नरेंद्र सावरकर, भूषण निमकर ग्रा प. सदस्य जालनापूर, अनिल भाऊ अडोकर, मा. सरपंच संजय कडू दिलीप मेहरे, नथुजी हिवसे, सोबतच राहुल कडू, रोशन घाटोळ, सोपान घाटोळ,अभिजीत निमकर, चेतन वानखडे, राहुल घाटोळ, सतीश हिवसे,विपुल निमकर, संजय राव हिवसे, ज्ञानेश्वर काळे,रवींद्र दिवसे, सागर अंबाळकर,हर्षल वानखडे, प्रवीण वानखडे,सचिन निमकर, अंकुश लेवलकर आणि शेकडो कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.
Discussion about this post