
उदगीर प्रतिनिधी :-
आज दिनांक एक जानेवारी 2025 रोजी विश्वशांती बौद्ध विहार उदगीर येथे भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त वीर योद्धांना आपल्या पूर्वजांना भीमसैनिकांच्या वतीने अभिवादन करण्यात आले. सुरुवातीला पूज्य भदंत नागसेन बोधी यांनी त्रिशरण पंचशील ग्रहण केले समता सैनिक दल, पॅंथर संघर्ष संघटना आणि लष्कर ए भीमा युवा संघटनेच्या वतीने भीमा कोरेगाव विजयस्तंभाच्या प्रतिकृतीला मानवंदना देण्यात आली. यावेळी संविधान प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. या कार्यक्रमास पूज्य भदंत नागसेन बोधि ,भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष एम .एम .बलांडे सर ,विद्यासागर डोरनाळीकर ,मानवाधिकार कार्यकर्ते नितीन एकुरकेकर, पॅंथर संघर्ष संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संघशक्ती बलांडे, जितेंद्र शिंदे, शिवकुमार कांबळे, समता सैनिक दलाचे कमांडर कमलाकर सांगवीकर, लष्कर ए भीमा संघटनेचे तालुकाध्यक्ष सुशील मादळे ,शहराध्यक्ष आशिष कोकणे, लखन कांबळे, संदीप गजगे ,विकी गायकवाड ,अमोल सोनवणे ,वैभव गायकवाड ,प्रकाश अवचारे ,दशरथ कांबळे इत्यादी भीमसैनिक महिला समता सैनिक दल, पॅंथर संघर्ष संघटना ,लष्कर ए भीमा संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते..
Discussion about this post