
पण मुळात संवेदनशील असणारी माणसं राजकारणात आल्यानंतर खरंच स्वतःचा स्वभाव बदलत असतील का ? आणि संवेदनशील माणसं राजकारणात खरंच टिकत नसतील का ? अश्या अनेक प्रश्नांची उत्तरं खासदार अमर काळेंकडे बघून मिळत असतात.
वर्धेचे खासदार अमर काळे.. संवेदना जपणारा लोकनेता. लोकांमध्ये लोकांसाठी जपणारे अमर काळे ‘राजकारणात कठोर मन हवं’ या वाक्याला फाटा देणारे नेते आहेत. जनतेप्रती प्रेम, आपुलकी व संवेदना जपणारा हा नेता धोपट मार्गाने राजकारण करणाऱ्या असंख्य लोकांपेक्षा फार वेगळा आहे. अलीकडे नांदगाव खं. तालुक्यातील मंगरूळ चव्हाळा येथील पारधी बेड्यावरील नागरिकांचा पुण्याच्या वाघोलीत भीषण अपघात झाला. अपघातात मृत झालेल्यांच्या कुटुंबियांना खासदार अमर काळे भेटायला गेले. खरंतर इतकं आभाळभर दुःख कोसळलेल्या ठिकाणी सांत्वन तरी काय करणार ? पण खासदार असलेले अमर काळे तिथे त्यांच्यासोबत लोकप्रतिनिधी म्हणून चर्चा करतच नव्हते. ते एक माणूस म्हणून त्यांचं दुःख जाणून घेत होते. त्यांच्या डोळ्यात संवेदना आणि दुःख याची किनार स्पष्ट झळकत होती. माणूस वरून कितीही कठोर वाटत असला तरी त्याचे डोळे फार खरं बोलत असतात. आणि याचा प्रत्यय या भेटीत येत होता. आर्थिक मदतीसह जखमी असलेल्यांना संपूर्ण उपचारासाठी सहकार्य करण्याचा शब्द खासदार काळेंनी दिला. यावेळी झालेल्या घटनेविषयीची हळहळ त्यांच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होती.
राजकारणासारख्या कठोर क्षेत्रात लोकांच्या जाणिवा जिवंत आहेत की नाही असा प्रश्न पडला असताना, अमर काळेंनी इथे दिलेली भेट मनाला भिडून गेली. मनात भावना जिवंत ठेवून केलेलं राजकारण जनहिताचं असतं. खासदार अमर काळे यापद्धतीचं संवेदनशील राजकारण या पुरोगामी महाराष्ट्राच्या मातीत रुजवत आहेत. सूडाच्या राजकारणाच्या गर्दीत खासदार अमर काळे Sympathy आणि Empathy दोन्ही जपणारे आणि माणूसपण जिवंत ठेवणारे लोकनेते आहेत..
Discussion about this post