वनपरिक्षेत्र अधिकारी
वनविभाग कार्यालय भूम
अर्जदार :- समस्थ ग्रामस्थ निपाणी
विषय :- निपाणी येथील गट नंबर 575 मधील वनविभागातील विदेशी झाडे काढून देशी झाडे लावणे बाबत
महोदय,
वरील विषयी विनंती अर्ज करण्यात येतो की, मौजे निपाणी ता. भूम येथे गट नंबर 575 क्षेत्र 82.92 आर हे क्षेत्र वनीकरण विभागाकडे राखीव म्हणून शासनाने हस्तांतरित केलेले आहे. पूर्वी या ठिकाणी हजारो देशी झाडे व औषधी वनस्पती व वेली होत्या. पण शासकीय धोरणानुसार मागील काही वर्षापासून त्या ठिकाणी देशी झाडे नष्ट करून विदेशी झाडांची लागवड केलेली असल्यामुळे त्या जागेवरील पूर्ण नैसर्गिक कालचक्र नष्ट झालेले आहे. विदेशी झाडांमुळे परिसरातील पक्षी, प्राणी, सरपटणारे प्राणी, कीटक हे पूर्ण नष्ट झालेले आहेत, सध्या त्या ठिकाणी सजीव चक्र थांबलेले असल्याचे दिसून येते. हे सर्व फक्त विदेशी झाडांमुळे झालेले आहे.
विदेशी झाडांमुळे सर्व प्राणी वानिकरणात न राहता शेतकऱ्यांच्या शेतात व गावठाण मध्ये प्रवेश करत असल्यामुळे हिंस्र प्राण्यापासून शेतकऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.. त्याच प्रमाणे रान डुक्कर च्या अनेक टोळ्या शेतकऱ्यांच्या पिकात हैदोस घालत आहेत. हेच जर जंगलामध्ये देशी झाडे असती तर त्यांना वनीकरण मध्येच त्यांचे जीवनचक्र चालेल.. जीवसृष्टी अस्तित्वात राहण्यासाठी मधमाशी सारखे कीटक जिवंत राहावेत म्हणून देशी झाडे असणे आवश्यक आहे..
म्हणून आपणास विनंती आहे की, गट नंबर 575 मधील विदेशी झाडे टप्प्या टप्प्याने उपटून काढून त्या ठिकाणी देशी झाडांची लागवड करावी, ही देशी झाडे लावण्यासाठी गावातील व परिसरातील अनेक निसर्ग प्रेमी श्रमदान करण्यास तयार आहेत. या देशी झाडांनी निगा व संगोपन करण्यासाठी ग्रामस्थ तयार आहेत अशी गावकऱ्यांच्या वतीने वनविभागाकडे मागणी केली आहे
संपादक .भरत तिवारी निपाणी