• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मोठी कारवाई: यवत पोलिसांकडून ‘मोक्का’तील सराईत गुन्हेगारासह टोळी जेरबंद; घरफोडीचे १० गुन्हे उघड

by
March 17, 2026
in Blog
0
मोठी कारवाई: यवत पोलिसांकडून ‘मोक्का’तील सराईत गुन्हेगारासह टोळी जेरबंद; घरफोडीचे १० गुन्हे उघड
0
SHARES
177
VIEWS
Ad 1

​प्रतिनिधी :~ दत्तात्रय यादव
यवत पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने आणि स्थानिक गुन्हे शाखेने LCB संयुक्तरित्या मोठी कारवाई करत खुनासह दरोडा आणि दोन ‘मोक्का’ गुन्ह्यांत फरार असलेल्या सराईत गुन्हेगारासह त्याच्या साथीदारांना अटक केली आहे. या कारवाईमुळे यवत आणि उरळी कांचन परिसरातील घरफोडीचे तब्बल १० गुन्हे उघडकीस आले असून, चोरीचा माल विकत घेणाऱ्या सराफ व्यावसायिकालाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

​
६ जानेवारी २०२६ रोजी पहाटे वाखारी ता. दौंड येथील एका घराचा कडी-कोयंडा उचकटून चोरट्यांनी १.९८ लाख रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम चोरली होती. तसेच सावंत सुभाष शेळके यांच्या घरातही चोरीचा प्रयत्न झाला होता. याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
​अशी झाली अटक
​

RelatedPosts

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

पोलीस निरीक्षक नारायण देशमुख आणि गुन्हे शोध पथकाचे अधिकारी सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय बातमीदारांच्या मदतीने तपास करत होते. तपासादरम्यान पोलीस हवालदार गुरुनाथ गायकवाड आणि विकास कापरे यांना संशयित आरोपीबाबत खात्रीशीर माहिती मिळाली. त्यावरून पोलिसांनी सापळा रचून रुकुल उर्फ अमर दशरथ चव्हाण वय ३१, रा. न्हावरा याला ताब्यात घेतले.
​कठोर चौकशीत त्याने आपल्या साथीदारांसह गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याचे साथीदार महेश संभाजी भोसले वय २२, रा. अहिल्यानगर आणि अमोल शास्त्री भोसले वय २०, रा. न्हावरा यांना अटक केली. तसेच चोरीचा माल विकत घेणारा सराफ किरण विलास बुऱ्हाडे रा. अहिल्यानगर यालाही पोलिसांनी अटक केली आहे.
​

आरोपीचा गुन्हेगारी इतिहास
​मुख्य आरोपी रुकुल चव्हाण हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर दरोडा, घरफोडी आणि आर्म ॲक्टचे एकूण १० गुन्हे दाखल आहेत. विशेष म्हणजे, सातारा जिल्ह्यातील उंब्रज आणि शिरूर पोलीस ठाण्यांतर्गत त्याच्यावर ‘मोक्का’ MCOCA कायद्यान्वये कारवाई करण्यात आली होती आणि तो या दोन्ही गुन्ह्यांत फरार होता.
​उघडकीस आलेले गुन्हे:
​यवत पोलीस स्टेशन सीमा: ०६ घरफोड्या
​उरळी कांचन पोलीस स्टेशन सीमा: ०४ घरफोड्या एकूण १० गुन्हे उघड
​”सराईत गुन्हेगारांना जेरबंद केल्यामुळे परिसरात गुन्हेगारीवर वचक बसेल. नागरिकांनी आपल्या परिसरात संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा.”
— यवत पोलीस प्रशासन
​ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी बापुराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली यवत पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.

Previous Post

Почему мобильные пользователи предпочитают 1win скачать вместо использования десктопа

Next Post

*मच्छिगट्टा येथे राष्ट्रीय शहिद विर बाबुराव शेडमाके यांच्या १९३ वा जयंती उत्साहात साजरा*

Related Posts

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
5
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…
Blog

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
48
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई
Blog

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026
58
Blog

सभासदांच्या सहकार्या ने संस्था प्रगतीपथावर.. . मात्र सभेत वाद – विवाद… .

September 13, 2026
33
नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी स्वप्नील ‘भैय्या’ आहिरे यांची नियुक्ती
Blog

नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी स्वप्नील ‘भैय्या’ आहिरे यांची नियुक्ती

September 13, 2026
84
Blog

आपल्या पंचकोशी मधील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय सन्माननीय संत सज्जन गुरुजन यांस सस्नेह नमस्कार.

September 13, 2026
18
Next Post

*मच्छिगट्टा येथे राष्ट्रीय शहिद विर बाबुराव शेडमाके यांच्या १९३ वा जयंती उत्साहात साजरा*

ताज्या बातम्या

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In