– पत्रकारीतेची कोणतीही पार्श्वभूमी नसताना वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षापासुन गजानन बाबर यांनी जिद्दीने वार्ताहर म्हणून कामाला सुरुवात केली. समाजात घडणाऱ्या अन्यायाविरुद्ध आपल्या शब्द सामर्थ्य असलेल्या लेखनीने आवाज उठवणारया व उपेक्षितांना प्रसिद्धी मिळवून देण्यासाठी निस्वार्थी भावनेने काम करणाऱ्या पत्रकाराच्या कार्याची दखल घेतली गेली. पत्रकारित्याला व्यवसाय म्हणून न पाहता पेशा किंवा सामाजिक बांधिलकी जपण्यासाठीच व्रत म्हणून काम करणाऱ्या पत्रकाराला मिळालेला पुरस्कार हा अभिमानास्पद आहे.
कधी काळी सलग पंधरा वर्षे अर्थार्जनासाठी यंत्रमाग कारखान्यात कामाला जाऊन,प्रसंगी पोटाला चिमटा देऊन पत्रकारीता जपणाऱ्या हरहुन्नरी व्यक्तिमत्वाला आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत पत्रकारिता सांभाळणाऱ्या,टिकवणाऱ्या आणि इतरांनाही शिकवणाऱ्या तळमळीच्या पत्रकाराला योग्य न्याय मिळाला अशी भावना विटे परिसरातून व्यक्त होत आहे.
विवेकानंद नगर येथील प्रसिद्ध साहित्यिक,पत्रकार,सामाजिक कार्यकर्ते,निवेदक,क्रांती न्युज चॅनेलचे मार्गदर्शक, हॉटेल व्यवसायिक गजानन बाबर यांना पत्रकारीतेतील अमुल्य योगदानाबद्दल राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.
रणरागिनी महिला सोशल फाऊंडेशन,आष्टा या संस्थेमार्फत दिल्या गेलेल्या या पुरस्कारामुळे विटे शहरातील गजानन बाबर यांना गुरुस्थानी मानणाऱ्या अनेक नव लेखकांची, नवागत पत्रकारांची मान उंचावली गेली आहे. अनेक सर्वसामान्य गरीब गरजू पत्रकार साहित्यिकांना यामुळे प्रेरणा मिळाली अशी भावना नवागातां कडून व्यक्त केली जात आहे.
हेव्हन हाॅल,आष्टा येथे दिमाखात पार पडलेल्या या कार्यक्रमासाठी राज्यभरातील विविध क्षेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावली.संस्थेच्या सहाव्या वर्धापनदिनानिमित्त झालेले या राज्यव्यापी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जिल्हा परिषदेचे गटनेते शरद लाड यांनी भुषविले. तर उद्घाटन सोहळा युवा नेते गौरव नायकवडी यांच्या हस्ते पार पडला.या प्रसंगी युवा व्याख्याते आण्णासाहेब शिंदे,’झी-टाॅकीज’ फेम किर्तनकार ऋषिकेश खारगे,’क्राईम पेट्रोल’फेम अभिनेते पॅडी गजगेश्वर यांच्या उपस्थितीत गजानन बाबर यांच्यासमवेत पत्नी सौ.शैला बाबर,चिरंजीव सार्थक बाबर यांनी सन्मान चिन्ह,सन्मानपत्र, शाल,श्रीफळ,भेटवस्तू या स्वरूपातील पुरस्कार स्वीकारला. यावेळी विटा आगार निवृत्त वाहतुक नियंत्रक गजानन गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते असफअली शिकलगार, कुंडल येथील निवेदक श्रीकांत माने यांच्यासह मित्रपरिवार उपस्थित होता.
विशेष बाब म्हणजे या कार्यक्रमात विट्यातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते,छायाचित्रकार,विटा क्रांती न्युजचे उपसंपादक उदय दिक्षित यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रणरागिनी महिला सोशल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संदीप कुडचीकर, उपाध्यक्ष निवेदक अंकुश राजमाने,सौ.स्वाती कुडचीकर,सौ.शुभांगी पाटील, यांचेसह पदाधिकार्यांनी अथक परीश्रम घेतले. ज्येष्ठ पत्रकार गजानन बाबर यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
Discussion about this post