साने गुरुजी विद्यालयात सत्कार समारोह संपन्न.
साने गुरुजी विद्यालय मेटीखेडा येथे दिनांक 31/12/2024 रोजी सेवानिवृत्त शिक्षक श्री अरुण महादेव सातपुते नियत वयोमानाने सेवानिवृत्त होत असल्याने त्यांच्या कृतज्ञता व्यक्त करण्याकरिता सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्रीमती मंगला सरोदे,( अध्यक्ष नवं समाज निर्माण मंडळ यवतमाळ )तर संस्थेचे सचिव ,अमित सरोदे, विजयराव सरोदे, राजेंद्र कांबळे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते त्या कार्यक्रमाची सुरुवात जग हे सारे सुंदर आहे या गीताने करण्यात आले.
सेवानिवृत्त शिक्षक श्री अरुण सातपुते यांचा सपत्नीक खादीचा सदरा व साडी देऊन शाळेच्या वतीने अमित भाऊ सरोदे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. तर संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष मंगलाताई सरोदे यांच्या हस्ते संस्थेचे गौरव पत्र देऊन सन्मान करण्यातआला तर शाळेचे मुख्याध्यापक गणेश अष्टकार पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला या कार्यक्रमाचे संचालन पंकज गिरे तर याप्रसंगी सर्व मान्यवरांनी सातपुते सरांच्या कार्यावर प्रकाश टाकला. सातपुते सरांनी सत्काराला उत्तर देताना या शाळेत 36 वर्षे सेवा केल्याने मी कृतघ्न आहे माझ्या परीने विद्यार्थ्यांकरिता मदत करण्याचे आश्वासन मुख्याध्यापकांना दिले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मुकेश येरमे यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सौ पद्मिनी सरोदे, सागर गायकवाड, हर्षदा सुरुपम ,पंजाब आंबुरे ,ज्ञानेश्वर कोवे, विद्यार्थी मित्र मंडळ, तसेच सर्व विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांनी सहकार्य .
सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून. वंदे मातरम राष्ट्रगीताने कार्यक्रमाचे सांगता करण्यात आली .
Discussion about this post