महाड-प्रकाश अंकुश दाभेकर
स्वामी विवेकानंद जयंती व राष्ट्रीय युवक दिनाचे औचित्य साधून किल्ले रायगडावर राज्यस्तरीय गडारोहण स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा रविवार, दि. 12 जानेवारी 2025 रोजी सकाळी 7 वाजता सुरू होणार आहे.
स्पर्धेचे वैशिष्ट्ये:
स्पर्धा यंदा आठ गटांमध्ये घेण्यात येईल आणि प्रत्येक गटासाठी पाच आकर्षक बक्षिसे देण्यात येतील.
- प्रथम क्रमांक: ₹5000 व प्रमाणपत्र
- द्वितीय क्रमांक: ₹4000 व प्रमाणपत्र
- तृतीय क्रमांक: ₹3000 व प्रमाणपत्र
- चतुर्थ क्रमांक: ₹2000 व प्रमाणपत्र
- पाचवा क्रमांक: ₹1000 व प्रमाणपत्र
प्रत्येक सहभागी स्पर्धकास सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल.
गटांचे वर्गीकरण:
पुरुष गट:
- प्रथम गट: 14 वर्षांपर्यंत
- द्वितीय गट: 14 ते 17 वर्षे
- तृतीय गट: 17 ते 21 वर्षे
- चतुर्थ गट: 21 ते 30 वर्षे
- खुला गट: 30 वर्षांवरील
महिला गट:
- प्रथम गट: 14 वर्षांपर्यंत
- द्वितीय गट: 14 ते 17 वर्षे
- खुला गट: 17 वर्षांवरील
महाराष्ट्रभरातील स्पर्धकांसाठी खुली स्पर्धा:
महाराष्ट्रातील सर्व विभागातील स्पर्धकांना या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी उपलब्ध आहे.
स्पर्धा संयोजक संपर्क:
- स्पर्धाप्रमुख: श्री. योगेश भागवत – 7276594727
- संतोष कदम – 9272408758
- मुकुंद भऊड – 7387918897
गडारोहण प्रेमींसाठी सुवर्णसंधी:
या स्पर्धेमुळे गडारोहणाची आवड असलेल्या युवक-युवतींना आपले कौशल्य दाखवण्याची उत्तम संधी मिळणार आहे. किल्ले रायगडाच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर होणारी ही स्पर्धा गडप्रेमींसाठी उत्साहवर्धक ठरणार आहे.
Discussion about this post