हदगावात रस्ते कॉंक्रिटीकरणाच्या कामाचा दर्जा तपासा- व्हॉइस ऑफ मीडिया ची मागणी,
प्रतिनिधि/सुनिल खानजोडे
नांदेड जिल्ह्यातील हदगाव शहरातील नगर परिषदेच्या हद्दीत निकृष्ट दर्जाची रस्त्याची कामे करण्यात येत असून त्या रस्त्याची कामे करण्यात येत असून कामांची कॉलिटी ऑडिट करा तसेच निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्या कंत्राटदारांची चौकशी करा. अशी मागणी व्हॉइस ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेने केली आहे. तसेच नगरपालिका बांधकाम अभियंता सचिन वाघमारे यांची भेट घेतली
अशाच प्रकारे शहरातील आठवडी बाजार ते यशवंत नगर हनुमान सोसायटी , हजरतअली नगर, रजा नगर, नागसेन नगर,येथे रस्त्याच्या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या सिमेंट गिट्टी रेती डस्ट हे ठरवून दिलेल्या प्रमाणामध्ये वापरण्यात जात नाही, वापरण्यात येणारी वाळू ही मातीमिश्रित असून ही रेती धोऊन घ्यायला पाहिजे तसे न करता सिमेंट रोड मध्ये लोखंडी गजाळीचा वापर सुद्धा होत नाही तसेच वेळोवेळी क्युरिंग पण होत नाही. शहरातील काँग्रेसच्या माजी आमदाराच्या आशीर्वादाने अनेक ठिकाणी जी कामे सुरू आहेत ती योग्य दर्जाची होत नाही अशी ओरड इथल्या नागरिकांकडून केली
जाते. कामांचे कॉलिटी ऑडिट करण्यात येते का? या संदर्भात नागरिकांच्या सातत्याने तक्रारी येत असून यासाठी एक विशेष तपास पथक स्थापन करावे आणि कामाच्या गुणवत्तेची, कंत्राटदारांकडून कामात राहणाऱ्या त्रुटींची तपासणी होऊन संबंधित कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांवर दंडात्मक कठोर कारवाई व्हावी अशी मागणी हदगाव विधानसभेचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर व जिल्हाधिकारी साहेब , तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , त्यांनी निवेदनामध्ये प्रतिलिपी मध्ये उल्लेख करण्यात आला
Discussion about this post