श्री शिवाजी माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय,पुसद. येथे नववर्षाचा स्वागत उत्सव उत्साहात साजरा.
सिद्धार्थ कदम
पुसद तालुका प्रतिनिधी
पुसद.स्थानिक श्री.शिवाजी माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय,पुसद. येथे वर्ग 5 ते 8 च्या विद्यार्थी/विद्यार्थिनींसह आज दिनांक 1 जानेवारी 2025 रोजी नववर्षाचा स्वागत उत्सव उत्साहात संपन्न झाला.उत्सवाचे अध्यक्षस्थानी श्री.शिवाजी माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय,पुसद.चे मुख्याध्यापक श्री.रामचंद्र हिरवे सर;तर उपाध्यक्ष म्हणून गुरुकुल इंग्लिश मेडियम स्कूलच्या सौ.सुरोशे मॅडम तथा प्रमुख अतिथी म्हणून श्री.शिवाजी विद्यालय,पुसद.चे मुख्य लिपिक श्री.शिवाजीराव ठाकरे,वरिष्ठ लिपिक श्री.संतोष ठाकरे,ग्रंथपाल श्री.पंजाबराव दातकर,गुरुकुल इंग्लिश मेडियम स्कूल,पुसद.च्या अध्यापिका स्वाती पाटील मॅडम,प्राची गायकवाड मॅडम, स्वाती सूरोशे मॅडम तथा पालक प्रतिनिधी म्हणून श्री.सिंधुपाल चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती लाभली
.मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज तथा श्री.शिवाजी शिक्षण संस्था,पुसद.चे संस्थापक अध्यक्ष स्व.देवराव पाटील (चोंढीकर) यांच्या प्रतिमेचे पूजन तथा दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.त्यानंतर मान्यवरांनी नववर्षाच्या कालदर्शिकेचे अनावरण केले तथा आनंददायी शिक्षण याउपक्रमांतर्गत अभ्यास पूरक खेळांना सुरुवात करून दिली.यामध्ये गणिताचा go through maths and grab surprises, तर भाषा विषयाचा कोडी सोडवा आणि उडी मारा अशा प्रकारचे वैविध्यपूर्ण खेळ घेण्यात आले. त्यानंतर आनंद मेळाव्याचे आयोजन स्काऊट
आणि गाईड विभागामार्फत करण्यात आले.आनंद मेळाव्याचे उद्घाटन विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.रामचंद्र हिरवे सरांनी केले.याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून गुरुकुल इंग्लिश मेडियम स्कूल,पुसद.च्या सौ.प्रांजली देशमुख मॅडम तथा सौ.स्नेहल हरणे मॅडम उपस्थित होत्या. मान्यवरांनी विद्यार्थी विद्यार्थिनींनी आणलेल्या वैविध्यपूर्ण पदार्थांचे अवलोकन केले तसेच आस्वाद घेतला. त्यानंतर विद्यार्थिनींचे संगीत खुर्ची,रस्सीखेच इ. मजेदार खेळ घेण्यात आले. दोन्ही उपक्रमांचे सूत्रसंचालन श्री.सारंग कोरटकर सरांनी केले.सदर स्वागतोत्सवाच्या यशस्वी आयोजना मध्ये सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ.सारिका जाधव मॅडम,सौ.अर्चना भगत मॅडम,सौ.विद्या ठाकरे मॅडम,सौ.रिता देशमुख मॅडम गणित विभागाचे कृतिशील शिक्षक श्री.सचिन नालींदे सर,श्री.सचिन भोयर सर,श्री.अतिश पत्रे सर,श्री.उल्हास टाले सर,श्री.परशराम वसावे सर,श्री.अविनाश देशमुख सर,श्री.नितीन गायकवाड सर,श्री.मंगेश जाधव सर,श्री.महेंद्र अंबुरे सर,श्री.चैतन्य ठाकरे सर,स्काऊट आणि गाईड विभागाचे प्रमुख श्री.शंकर डुद्दूळे सर,सौ.सपना राऊत मॅडम यांचे सह सर्व शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनींनी मोलाचे सहकार्य केले.
Discussion about this post