‘नातिया स्पर्धेत’ गुलाम नबी आझाद उर्दू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचा प्रथम क्रमांक.
सिद्धार्थ कदम
पुसद तालूका प्रतिनिधी
दिनांक 28/12/24, पुसद.
उर्दू हायस्कूल पुसद येथे तालुका स्तरावर नातिया स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.यामध्ये पुसद परिसरातील सर्वच शाळेने सहभाग नोंदविला होता.यामध्ये गुलाम नबी आझाद उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स अँड आर्ट्स पुसद च्या दोन विद्यार्थिनींना यश मिळाले ज्यात अल्फिया खानम शेख अब्बास वर्ग 11 वी कला या विद्यार्थिनीला प्रथम क्रमांक मिळाला. तर वर्ग 8 वी ब च्या सबिहा तहेरीम शेख मुफिज हिला द्वितीय क्रमांक मिळाला.
याबद्दल गुलाम नबी आझाद उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स अँड आर्ट्सचे मुख्याध्यापक सादिक शेख सरांनी या यशस्वी विद्यार्थिनीचे अभिनंदन केले. तसेच पुढील वाटचाली करीता शुभेच्छा दिल्या.विद्यार्थिनीने मिळवलेल्या यशासाठी विशेष प्रयत्न मा.मिर्झा नजीउल्लाह यांनी केले सोबतच उमर फारक सरांनी सहकार्य लाभले.तसेच शाळेतील सर्वच शिक्षकांनी या विद्यार्थिनीचे कौतुक केले.
Discussion about this post