भीमा कोरेगाव शौर्य दिवस व सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त तीन दिवसीय कार्यक्रमांचे आयोजन
तुमसर: शिल्पकार मंच तुमसर यांच्या वतीने भीमा कोरेगाव शौर्य दिवस आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त तीन दिवसीय प्रेरणादायी आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हे कार्यक्रम १ जानेवारी २०२५ ते ३ जानेवारी २०२५ या कालावधीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसर, संविधान चौक,
आंबेडकर नगर येथे पार पडतील.पहिल्या दिवशी सामूहिक बुद्ध वंदना, पंचशील ध्वजारोहण, भीमा कोरेगाव जयस्तंभाला सलामी आणि बाईक रॅलीसारखे उपक्रम उत्साहात पार पडले.दुसऱ्या दिवशी, २ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ६.१५ वाजता सुप्रसिद्ध प्रबोधनकार प्रकाशनाथ पाटणकर यांचे समाजप्रबोधन व्याख्यान होणार आहे.तिसऱ्या दिवशी, ३ जानेवारी २०२५ रोजी सकाळी सावित्रीबाई फुले यांना मानवंदना दिली जाईल. दुपारी सांस्कृतिक कार्यक्रम आणि सायंकाळी विद्यार्थ्यांसाठी मोफत करिअर मार्गदर्शन सत्र आयोजित केले आहे, ज्यामध्ये प्रमुख वक्ते म्हणून विकास मानवटकर (Global Sourcing Director-USA) उपस्थित राहतील.शिल्पकार मंच तुमसरने या कार्यक्रमांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून सामाजिक योगदान देण्याचे आवाहन केले आहे..
Discussion about this post