(ता.प्र) शेख मोईन.
भारतीय समाज व्यवस्थे मध्ये स्त्री पुरुष विषमता पहावयास मिळते लिंगभेदाच्या आधारावर समाजामध्ये भेदभाव केला जातो. भारतीय समाजा हा रुढी, परंपरा, अंधश्रद्धा, अज्ञान व वर्णव्यवस्था या बुरसटलेल्या विचार श्रेणी वर आधारित होता. भारतीय समाजामध्ये स्त्रीला दुय्यम स्थान दिले जात असे. स्त्री हे परक्याचे धन आहे, तिचा शिकून समाजासाठी काही उपयोग होणार नाही .ही मानसिकता पुरुषी वर्गाची होती. तिचे अस्तित्व चूल आणि मुल एवढ्या पुरतेच मर्यादित होते. पण आता तिचे अस्तित्व एवढ्या पुरतेच मर्यादित राहिले नाही. तर तिचे अस्तित्व गल्लीपासून ते दिल्ली पर्यंत तयार झाले आहे. ते केवळ एका स्त्रीमुळे च म्हणावे लागेल ती स्त्री म्हणजे सावित्रीबाई होय.
ज्ञान ज्योती सावित्रीबाईचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील आणि आईचे नाव लक्ष्मी बाई असे होते, 1840 मध्ये वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी सावित्रीबाई चा विवाह महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी झाला तेव्हा त्यांचे वय 12 वर्ष होते.
सावित्री बाईंना ज्योतिबा फुले यांच्या रूपाने एक सुशिक्षित समाज हितवादी, परोपकारी व समाज सुधारक पती मिळाले. सावित्रीबाई ना कुठलेच अक्षर ओळख नसताना महात्मा फुलेंनी सावित्रीबाईला शिक्षणाचे धडे गिरवायला सुरुवात केली. ते जमिनीला पाटी व छोट्या काडीला लेखणी समजत व त्यातूनच शिक्षणाचे धडे गिरवत असत. महात्मा फुले म्हणतात, ‘जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा उद्धार करी,’ म्हणजे एक माता शिकली की सर्व कुटुंब शिकते ही धारणा महात्मा फुले यांची होती. म्हणून त्यांनी आपल्या पत्नीला अगोदर शिक्षणाचे धडे दिले व शिकवून हुशार बनविले. सावित्रीबाई यांचे प्रेरणास्थान ब्रिटिश अधिकाऱ्याची पत्नी मिसेल ने पुण्यातील छाबिलदास च्या वाड्यात मुली साठी सामान्य शाळा सुरू केली.
सावित्रीबाई ही तिथेच शिकु लागल्या. शिक्षण घेत असताना सावित्रीबाईंनी गुलामगिरी विरोधात काम करणाऱ्या थॉमस कलारसन यांचे जिवण चरित्र वाचलं. त्यात अमेरिकेच्या आफ्रिकन गुलामांच्या जीवनाची संघर्षमय शोककथा छापली गेली होती. सावित्रीबाईंना समजले की शिक्षण हे परिवर्तन असे एक मजबूत साधन आहे. त्यामुळे त्यांनी समाजातील महिलांना शिक्षण देण्याचे स्वप्न साकारले.
भारतीय समाज व्यवस्थाही अनेक धार्मिक कर्मकांडात अडकलेली होती. अनेक जाचक अटी होत्या. त्या अटीमध्ये जर महिलांनी शिक्षण घेतले तर जग बुडते अक्षर गिरवले तर त्याच्या आळ्या होतील असा त्यांचा भ्रम होता. 1 जानेवारी 1848 रोजी बुधवार पेठेत मुलींची पहिली शाळा सुरू केली. पहिल्याच दिवशी सहा मुली शाळेत आल्या. त्याकाळी मुलींना शिकवण्यासाठी कोणीच तयार होत नसत तेव्हा महात्मा फुलेंनी आपल्या पत्नीला म्हणजेच सावित्रीबाई फुले त्या शाळेत शिकवू लागल्या. त्याकाळी एका महिलेने शिक्षकाचे काम करणे म्हणजे अत्यंत समाज द्रोही व धर्मद्रोही गोष्ट समजली जायची त्यामुळे पुण्यातील सनातन्यांची तळपायाची आग मस्तकात गेली कलियुग आलं धर्म बुडाला
अशा प्रकारचे शब्द सावित्रीबाईच्या कानावर पडत. सावित्रीबाई शाळेत जाताना उच्च वर्गातील पुरुष मंडळी ही त्यांना वेगळ्या नजरेने पहात असत. त्यांना शाळेत जाताना चिखल, दगड,शेण,माती, त्यांच्या अंगावर टाकली जायायची त्या ते सहन करत असत. त्या कोणाला ही काही बोलत नसत. त्यांनी आत्मविश्वासाने आलेल्या प्रत्येक प्रसंगाला तोंड दिले. स्त्री शिक्षणाची ज्योत आपल्या मनात तेवत ठेवली.
त्या काळी अनेक प्रथा होत्या केशवपन पध्दत, बालविवाह, विधवा विवाह प्रथा बाल हत्या यासारख्या प्रथा होत्या यासाठी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी कार्य हाती घेतले. स्वतःला बोचणारे आपत्य हिन पणाचे दुःख पळवून लावण्यासाठी त्यांनी यशवंत नावाच्या मुलास दत्तक घेतले. सावित्रीबाई फुले यांनी पुनर विवाहासाठी संघर्ष केला. विधवांची दुर्दैवी परिस्थिती पाहता त्यांनी विधवा पुनर्विवाह सुरू केले. 1854 मध्ये विधवा साठी आश्रम बांधले, स्त्री बाल हत्या रोखण्यासाठी त्यांनी नवमाता मुली
साठी एक आश्रमही उघडले. काशीबाई नावाच्या गरोदर विधवा महिलेला आत्महत्या करण्यापासून रोखलेच नाही तर तिला आपल्या घरीच ठेवले आणि तिची काळजी घेतली. त्यांनी तिचा मुलगा यशवंत यांना दत्तक घेतले आणि त्याला चांगले शिक्षण दिले नंतर तो एक प्रसिद्ध डॉक्टर झाला.
आजच्या आधुनिक युगात स्त्री ही सबला बनली आहे. शिक्षणाचे प्रमाण वाढले आहे ते केवळ एका स्त्रीमुळे म्हणजे च सावित्रीबाई फुले यांच्या मुळेच म्हणावे लागेल. सावित्रीबाई फुले यांचे चरित्र म्हणजे समाजाला अज्ञानमय अंधकारातून प्रकाशाकडे नेणारा एक दिशादर्शक मार्ग आहे.
, सावित्री फक्त तुमच्या मुळेच
मिळाले महिलांना ज्ञान आज
‘ जगती होत आहे महिलांचा सन्मान,, होत आहे प्रगती’
सावित्रीबाई फुले मुळे सर्वच महिलांमध्ये एक नवचैतन्य निर्माण झाले आहे. स्त्रियांनी प्रत्येक क्षेत्रात उत्तुंग अशी कामगिरी केली आहे. तंत्रज्ञान,जसे अंतराळ, विज्ञान,खेळ, सैन्य,या सर्वच क्षेत्रात महिलांनी उंच भरारी घेतली आहे. आज महिला या गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत विविध क्षेत्रात पोहोचल्या आहेत. जसे की पहिली महिला अंतरा ळविर कल्पना चावला, जागतिक बॉक्सर मेरी कोम, बॅडमिंटन पटु पी व्ही सिंधू, क्रिकेटर स्मृती मंधना, नेमबाजी तेजस्वी सावंत, कुस्ती पटू गीता फोगट, गायन सामग्री लता मंगेशकर, मदर टेरेसा, व आजच्या महिला राष्ट्रपती द्रोपदी मुरमु व तसेच इस्रोच्या चंद्रयान तीन मोहिमेच्या मिशेन दिरेकटर रितु करिधाल ह्या महिला आपले नाव यशोशिखरावर पोहचविले आहे.
आज सद्यस्थितीत एक नवीन समस्या निर्माण झाली आहे ती म्हणजे, स्त्री भ्रूण हत्या, ही समस्या महिलांमध्ये उग्र रूप धारण करीत आहे या मागची अनेक कारणे आहेत. जर महिलांनी गर्भातील अंकुराला नष्ट केले तर ते कसे फुलणार. व वरील महिलांच्या आदर्श कसा घेणार. म्हणून एवढेच सांगावेसे वाटते की, प्रत्येक महिलांनी आपल्या घरातील मुलींना सावित्री समजून शिक्षण द्यावे. व आपल्या घरात सावित्री जन्माला यावी अशी अपेक्षा बाळगावी. जर महिलांचे प्रमाण कमी झाले तर आपल्या देशाचे नाव कसे होईल याचाही विचार महिलांनी करावा.
सावित्री बाईच्या सामाजिक कार्याबद्दल कृतज्ञता म्हणून 1995 पासून 3 जानेवारी हा सावित्रीबाई फुले यांचा जन्म दिवस हा बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. 10 मार्च 1998 रोजी भारत सरकारने सावित्रीबाई यांच्या शैक्षणिक व सामाजिक योगदानाचे महत्व अधोरेखीत करित दोन रुपयांचे तिकीट काढले व तसेच सावित्रीबाई फुले यांच्या नावाने विविध योजना राबविण्यात येतात. शिष्यवृत्ती पण मंजुर करण्यात आली आहे. शिक्षणाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुणे येथील विद्यापीठास सावित्रीबाई फुले असे नाव देण्यात आले आहे .सावित्रीबाई फुले यांचे कार्य शिक्षणापुरतेच मर्यादित नसून त्या एक कवियत्री म्हणून देखील परिचित आहेत. काव्यफुले , बावन काशी, सुबोध रत्नाकर, हे काव्य रचना आहेत. महात्मा फुलेंच्या मृत्यूनंतर त्या सतत कार्य मग्न राहिल्या आणि समाजाचे ऋण फेडत राहिल्या. 1897. ला पुण्यात महाभयंकर अशी प्लेगची साथ सुरू झाली. सावित्री बाईंनी स्वतःच्या जीवाची परवा न करता रुग्णांची सेवा करीत राहिल्या. अशातच त्यांना देखील प्लेग या आजाराने ग्रासले आणि त्यातच 10 मार्च 1897 रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला.
शेवटी असे म्हणावे वाटते,
शिक्षणाच्या स्वर्गाचे जीने उघडले दार,
तीच सावित्री आज जगाची शिलेदार,
अशा या महान थोर क्रांतीज्योती, ज्ञान ज्योती,दिनदुबळयाची माय माता सावित्री यांच्या 194 जयंती निमित्त कोटी कोटी प्रणाम,
प्रा.शेळके सुदर्शन किशनराव
श्रीनिवास विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालय, वसमत.
मो.न.9822644781
Discussion about this post