सिद्धार्थ कदम
पुसद तालुका प्रतिनिधी
पुसद :नवीन वर्षाचा माणुसकीचा उपक्रम माणुसकीची भिंत ही मागील दहा वर्षापासून पुसद व यवतमाळ जिल्ह्यात गरजवंतांना मदत करून सहकार्य करत आहे पुसद परिसरातील बरेच मनोरुग्ण माणुसकीची भिंत मार्फत यवतमाळ येथील नंदादीप फाउंडेशन येथे पाठवण्यात आले व ते दुरुस्त होऊन त्यांच्या घरी ही गेले माणुसकीची भिंत शनी मंदिर येथे गरज नसतात असे कपडे पुसद येथील नागरिकआणून ठेवतात तेच कपडे माणुसकीची भिंत सदस्य हे धुवून प्रेस करून
त्यांना योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचवतात 2024 मधील शिल्लक सर्व कपडे यवतमाळ येथील नंदादीप फाउंडेशन येथे नेऊन देण्यात आले मनोरुग्णांना थंडीच्या दिवसात हे कपडे कामी पडतील असे मत नंददीप फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी व्यक्त केले नंददीप फाउंडेशन येथे साधारण एकशे अंशी ते दोनशे मनोरुग्ण आहेत यवतमाळ जिल्ह्यामधील पूर्ण मनोरुग्ण संदीप भाऊ यांच्या मनोरुग्ण केंद्रात दुरुस्त होऊन त्यांच्या घरी जात आहेत
आत्तापर्यंत दोन ते तीन हजार मनोरुग्ण दुरुस्त होऊन महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बाहेर त्यांच्या घरी सुखरूप नंददीप फाउंडेशनच्या मार्फत पोहचती करण्यात आलेले आहे त्यांच्या कार्याचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे यावेळेस माणुसकीची भिंत सदस्य महिला सदस्य व शुभचिंतकांनी परिश्रम घेतले.
Discussion about this post