धरणगावजवळ शेतमजूर महिलांना शेतात नेणाऱ्या वाहनाचा अपघात, १ ठार ७जखमी
आज दिनांक :-30 जुलै रोजी सकाळी धरणगाव येथे शेत मजूर शेतात जात असताना गाडी पलटी होऊन १महिला जागीच ठार झाली असून ७ महिला मजूर जखमी झाले असून प्रतापराव पाटील यांनी धरणगावातील अपघातग्रस्तांची तातडीने जळगाव जिल्हा रुग्णालयात भेट घेतली. तसेच डॉक्टरांना उपचारासंबंधी सूचना दिल्यात.
आज सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास झायलो कारमधून काही मजूर महिलांना शेतात नेण्यात येत होते. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पुढे एका ठिकाणी गाडी अचानक पलटी झाली. या अपघातात कारमधील बसलेले सर्व शेतमजूर महिला मोठ्या प्रमाणात जखमी झाले आहेत. दरम्यान, धरणगाव वैद्यकीय रुग्णालयातून मिळालेल्या माहितीनुसार चंद्रकलाबाई महाजन यांचा मृत्यू झाला आहे. तर निनाबाई महाजन, सुमन महाजन, माधुरी महाजन, जिजाबाई महाजन, स्वाती महाजन, ढगूबाई महाजन, महेंद्र पाटील हे जखमी आहेत. सर्व जखमींना जळगाव येथे पुढील उपचारासाठी रवाना करण्यात आले आहे.
Discussion about this post