खुनी नदीवरील ब्रिटिशकालीन पुल पाण्याखाली.’-
ता.प्र.गणेश बेतवार
पांढरकवडा
शहरातील नाल्याकाठावरील अनेक घरात पाणी शिरले असून शहरालगत वाहणाऱ्या खुनी नदीवरील ब्रिटिशकालीन पुल पाण्याखाली आला आहे. तालुक्यात सतत पडत असलेल्या पावसामुळे शेतीची कामे खोळंबिली आहे. अनेक शेतात पावसाचे पाणी साचुन शेती चिबाडल्या आहे.
आज २८ रोजीच्या पहाटे पासुन पावसाने चांगलाच जोर धरला होता. तालुक्यात सर्वत्र मुसळधार पाउस पडल्याने नदी, नाल्यांना मोठा पुर आला आहे. शहरलगत वाहणाऱ्या खुनी नदीवरील ब्रिटिशकालीन पुल बुडल्याने पांढरकवडा शहरातील नदी काठीवरील महांगपुरा, कुंडीघाट, राममंदिर परिसरातील अनेक घरात पुराचे पाणी शिरले होते. त्याच – प्रमाणे शहरातील रामदेवबाबा कॉलनी, गाडगे ले आउट, गजानन महाराज मंदिर, ग्रीन पार्क, गोपाळकृष्ण नगरी येथे पुराच्या ■ पाण्याने अनेक प्लॉट व ओपन स्पेस मध्ये तळे साचले आहे. गजानन महाराज मंदिरा ■ जवळील रस्त्यावरुन तर गुडघाभर पाणी वाहत होते.
5 नदी, नाल्या काठीवरील पुराचे पाणी घरात शिरलेल्या नागरिकांसाठी न प हिंदी शाळेत राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. पुरग्रस्त नागरिकांसाठी दोन
वेळच्या जेवणाची व्यवस्था सामाजीक कार्यकर्ते सलीम खेतानी यांच्या खेतानी फाउंडेशनच्या वतीने करण्यात आली आहे. सततच्या पावसामुळे ग्रामीण भागातील नाल्यांना सुध्दा पुर आल्याने काही काळ वाहतुक सुध्दा प्रभावित झाली होती.
Discussion about this post