मानोरा प्रतिनिधी /विशाल मोरे
मानोरा : वाशीम जिल्ह्यातील मानोरा सोडून जवळ जवळ पाचही तालुक्या मध्ये कापूस खरेदी केंद्र सुरू आहेत . त्यामुळे मानोऱ्यातील कापूस उत्पादकांना कष्टाने पिकविलेला कापूस बाहेर तालुक्यामध्ये विक्री साठी न्यावे लागत आहे. त्यासाठी शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान तर होतेच सोबत त्यांना भरपूर त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे मानोऱ्याला कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी भारत कृषक समाज चे विभागीय अध्यक्ष के जी देशमुख , वाशिम जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत गजाननराव देशमुख यांनी सी सी आय चे व्यवस्थापकीय अधिकारी श्री. अमित कुमार यांच्या शी चर्चा करून कापूस खरेदी केंद्र लवकरात लवकर सुरू करण्याबाबत निवेदन देण्यात आले. श्री. अमित कुमार यांनी सुध्दा वरिष्ठांना प्रपोजल पाठवून 15 जानेवारी पर्यंत सेंटर सुरू करण्याबाबत आस्वस्त केले.
Discussion about this post