प्रतिनिधी:- राजेंद्र मुजागे
धुळे, देवपुरात जुन्या अग्रा रोडवर दत्त मंदिर पासून पुढे रस्त्याच्या कडेला मोठी भाजी मंडई दररोज सकाळ संध्याकाळ भरत असताना भाजीपाला विक्रेत्या महिला भगिनी बांधवांस भाजीपाला घेण्यासाठी आलेल्या ग्राहकांचा जीव देखील धोक्यात असतो. हा रस्ता वरदळीचा आहे त्यामुळे अपघात होऊन जीवित हानी होण्याची शक्यता देखील आहे. ही गंभीर बाब लक्षात घेऊन आज मी स्वतः भाजी मंडई येथे भाजी विक्रेत्या महिला भगिनींशी चर्चा केली. तुमचा भाऊ तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही हा विश्वास दिला सुरक्षित स्थळी तुम्हाला व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून देईल असा शब्द दिला. त्यामुळे महिला भगिनींनी साथ दिली त्यानंतर महापालिकेत मनपायुक्ता श्रीमती अमिता दगडे पाटील यांच्यासह प्रशासनातील अधिकाऱ्यांशी देवपुरातील भाजी मंडई हलवण्यासंदर्भात चर्चा केली. देवपुरातील भाजी मंडई येत्या पंधरा दिवसात नवरंग पाण्याच्या टाकीजवळ स्थलांतरित करण्यात येईल .ग्राहकांनी देखील येथूनच भाजीपाला विकत घेऊन सहकार्य करावे असे आवाहनही मी केले. भविष्यात ज्यावेळी पक्की भाजी मंडई उभारली जाईल तेव्हा नवरंग पाण्याच्या टाकी परिसरात भाजी विक्री करणाऱ्या महिला भगिनी आणि बांधवांना प्राधान्य देण्यात येईल असा शब्दही मी दिला. आमचा भाऊ आमच्या व्यवसायासाठी जागा मिळवून देण्यासाठी खंबीर आहे अशा प्रतिक्रिया यावेळी माझ्या भाजीविक्रेत्या महिला भगिनींनी दिल्या. महापालिकेतील बैठकीनंतर आयुक्त श्रीमती अमिता दगडे पाटील आणि मनपाचे अधिकाऱ्यांसोबत नवरंग पाणी टाकी परिसराची पाहणी केली. येत्या पंधरा दिवसात भाजी मंडई स्थलांतरित होईल. यावेळी माझ्यासोबत भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्रशेठ अंपळकर महादेव भैय्या परदेशी, ओम खंडेलवाल यांच्या सह मनपाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.



आ.अनुप ओमप्रकाश अग्रवाल
धुळे शहर विधानसभा मतदारसंघ
Discussion about this post