प्रतिनिधी केज.नांदुर घाट
शेतकऱ्यांना रात्र अहो रात्र शेतामध्ये पाणी देण्यासाठी जावं लागत होतं ते आता टळणार आहे मुख्यमंत्री सौर कृषी वाहीणी अंतर्गत
माळेगाव 33 KV येथे अतिरिक्त 5 MVA ट्रान्सफार्मर बसवण्याचे काम तातडीने सुरू करण्यात येणार आहे.
तसेच मस्साजोग, #विडा, बनसारोळा, राजेगाव, बाघुळगाव (सर्व ता.केज) या 33 के.ही उपकेंद्रात अतिरिक्त ५ एमव्ही चे रोहित्र बसविले जाणार असून सौरउर्जेचा वापर करून शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा करण्यात येईल. योजनेत मंजूर झालेल्या उर्वरित 33 के.व्ही. उपक्रकेंद्रातील अतिरिक्त पॉवर ट्रॉन्सफोर्मर बसविण्याचे काम दोन महिन्यात पूर्ण होईल.
त्यानंतर सौर पॅनलचे काम करण्यात येईल. यासोबतच आपेगाव, कुंबेफळ (ता. अंबाजोगाई), आडस, केज, धनेगाव (ता. केज) या 33 के.व्ही. उपकेंद्रातील दुरूस्ती कामे करण्यात येणार आहेत. सदरील कामे पूर्णत्वास गेल्यानंतर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. यानिमित्ताने शेतकऱ्यांची मोठी अडचण दूर करून त्यांना दिलासा दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तथा उपमुख्यमंत्री अजित पवार, मंञी ना.पंकजाताई मुंडे, भाजप नेत्या प्रीतमताई मुंडे यांचे आ.नमिता मुंदडा यांनी आभार मानले आहेत.
Discussion about this post