भुम पंचायत समितीला कायमस्वरूपी गटविकास अधिकारी नसल्यामुळे सर्वच कामांना ब्रेक.
भूम;; पंचायत समिती म्हणजे ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांना तसेच शेतकरी वर्गासाठी तसेच मनरेगा अंतर्गत काम करणाऱ्या मजूरांना एक प्रकारे मिनी मंत्रालयच आहे परंतू या मिनी मंत्रालयाचा मुख्य गट विकास अधिकारी मागील दिड ते दोन वर्षांपासून कायमस्वरूपी गटविकास अधिकारी नसल्यामुळे मिनी मंत्रालयात येणाऱ्या शेतकरी, नागरीक व मनरेगा मजूरांची कामे मार्गी लागत नाहीत तसेच शासनाकडून ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांसाठी जाहीर केलेल्या अनेक योजना जसे की जवाहर विहीर योजना, जनावरांसाठी गायगोठा, घरकुल अशा अनेक योजनांपासून नागरीक वंचित रहात आहेत.
आचारसंहीतेमूळे काही ग्रामीण भागातील मंजूर असलेली शेत रस्त्यांची कामे आचारसंहिता संपून एक ते दोन महिने उलटले तरी कायमस्वरूपी गटविकास अधिकारी नसल्यामुळे अजूनही बंदच आहेत.त्यामुळे नागरीकांचे हाल होत आहेत.तसेच काही कामे पूर्ण झाली आहेत अशा कामांची बिले ही गटविकास अधिकारीयांची डिएससी नसल्यामुळे परत जात आहेत
आत्ता तरी लोकप्रतिनिधीनी जागे व्हावे व कायमस्वरूपी गटविकास अधिकारी भूम पंचायत समितीला द्यावा अशी मागणी नागरीकांमधून होत आहे.
Discussion about this post