विहिरगाव प्रतिनिधी: रजत चांदेकर

उप अभियंता पाणी पुरवठा विभाग राळेगाव यांचे कामाकडे दुर्लक्ष राळेगाव तालुक्यातील दहेगाव येथे जल जीवन मिशन अंतर्गत तालुक्यातुन सर्वात मोठी २ लाख लिटर पाण्याच्या टाकीचे बांधकाम सहा महिन्यांपासून सुरू आहे परंतु १महीन्यापासुन मध्यंतरी काही कारणास्तव टाकीचे बाधकाम बंद आहे पण जे टाकीचे बांधकाम होऊन आहे त्या बांधकाम ला एक महीन्यापासुन पाणी मारणे बंद आहे त्यामुळे टाकीचे बांधकाम कच्चे राहु शकते व भविष्यात काही दुर्घटना झाल्यास याला जबाबदार कोण अश्या बेजबाबदार उप अभियंता पाणी पुरवठा विभाग राळेगाव व कंत्राटदारवर कारवाई झाली पाहिजे अशे दहेगाव येथील नागरिकांत बोले जात आहे विशेष बाब म्हणजे तालुक्यात सर्वात मोठ्या टाकीचे बांधकाम सुरू असुन तरी एन. मोठे प्रभारी उप अभियंता पाणी पुरवठा विभाग राळेगाव यांनी साधी भेट सुद्धा दिली नाही
Discussion about this post