11 Total Views , 1 views today
जि.प.शाळांच्या क्रिडा स्पर्धा संपन्न झाल्या.यावेळी स्पर्धा आयोजित करण्याचा मान जि प शाळा खांबे यास मिळाला. यावेळी सर्व शाळांनी उस्फूर्तपणे सहभाग नोंदविला. स्पर्धा कार्यक्रम स्थळी *प्रमुख पाहुणे म्हणून खांबे गावचे सरपंच मा.श्री रविंद्र दातीर व ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब शिंदे शा.व्य.समिती सदस्य चेतन पोंदे ,मंगेश शेंडगे, संदीप दातीर, राहूल दातीर,आदी मान्यवर व पालक उपस्थित होते*.तसेच वरवंडीकेंद्रातील सर्व मुख्याध्यापक व शिक्षकवृंद, न्यू इंग्लिश स्कूल खांबे चे सर्व शिक्षक उपस्थित होते. * *सदर कार्यक्रमासाठी गावचे सरपंच श्री रविंद्र दातीर यांनी 2100 रुपये रोख रक्कम मुलांना खाऊ वाटप व बक्षीस वितरण साठी दिले* *तसेच श्री भाऊसाहेब शिंदे व श्री चेतन पोंदे यांनी विध्यार्थी ना खाऊ म्हणून चॉकलेट पुडे दिले*. *सदर रक्कमे मधून प्रथम तीन क्रमांक संपादन करणाऱ्या विध्यार्थीना पेन,पेन्सिल व बिस्कीट पुडा चे वाटप करण्यात आले*. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री.सासवडे सर,गोफणे सर,कापडी सर ,शिंदे सर,श्रीम.शेटे मॅडम तसेच वरवंडी केंद्रातील सर्व मुख्याध्यापक व शिक्षक या सर्वांचे अनमोल सहकार्य लाभले.अतिशय खेळीमेळीच्या व आनंददायी वातावरणात विविध क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या.
Discussion about this post