



खांडबारा (प्रतिनिधी मनोज चौधरी)
नवापूर तालुक्यातील चोरवीहिर येथे बाल आनंद मेळावा आयोजित करून विद्यार्थ्यांना व्यवहारिक ज्ञानाविषयी माहिती देण्यात आली.
बाल आनंद मेळाव्याचे उदघाटन चोरविहीर गावाच्या सरपंच सौ. मायावतीताई गावीत यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांनी एकूण 30 स्टोल लावले होते. यावेळी खिचडी, खमण, पाणीपुरी, पोहे, भजी, गुलाब जामून, उपमा, इडली, उसळ, पास्ता, बिर्याणी, पोंगे बटाटे, पापड, पाववडे, बॉईल अंडे अश्या विविध खाद्यपदार्थ खवैय्यांसाठी मांडण्यात आले होते.
यावेळी शालेय परिसराची सजावट करण्यात आली होती. बाल आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सर्व गावकरी तसेच पालक यांनी बनविलेल्या पदार्थांचा स्वाद घेतला.बाल आनंद मेळावा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मुख्याध्यापक श्री विजय शिरसाठ तसेच उपशिक्षिका ललिता पानपाटील, उपशिक्षक निनाद शिंपी, संदिप पाटील, भूषण पाटील यांनी परिश्रम घेतले..
Discussion about this post