संपूर्ण जग आत्ताच कुठे कोरोनाच्या महामारीतून बाहेर पडत असतानाच चीनमधील आणखी एका व्हायरस ने तोंड वर काढलय. कोरोनानंतर पाच वर्षांनी चीनमध्ये HMPV हा नवा व्हायरस पसरला असून या व्हायरसमुळे संपूर्ण देशातील हॉस्पिटलमध्ये रुग्णांची गर्दी पाहायला मिळत आहे. शिवाय स्मशानभूमीमध्ये मृतदेहांचा खच पडलाय.
▪ या HMPV व्हायरसची लक्षणे कोरोना व्हायरस सारखीच आहेत. चायना सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शननुसार, त्याची लक्षणे खोकला, ताप, नाक बंद होणे आणि घशात घरघर येणे यांचा समावेश आहे. त्यामुळे चीनची आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. मात्र अजूनपर्यंत ठोस उपाययोजना करण्यात चीनला यश आलेले नाही.
▪ ‘ह्यूमन मेटान्यूमो व्हायरस’ म्हणजेच HMPV हा एक आरएनए व्हायरस आहे. खोकल्यामुळे आणि शिंकण्याने व्हायरस पसरण्याचा धोका जास्त असतो. जर विषाणूचा प्रभाव तीव्र असेल तर तो ब्राँकायटिस आणि न्यूमोनिया देखील होऊ शकतो. या व्हायरसची लागण झाल्यानंतर श्वास घेण्यास त्रास होतो. हा व्हायरस प्रामुख्याने खोकला आणि शिंक आल्यानंतर वेगाने पसरतो.
Discussion about this post