रांजणगाव गणपती प्रतिनिधी :बाळासाहेब कुंभार
आमदाबाद ता . शिरूर जि .पुणे येथील सौरभ थोरात यांनी यूपीएससी परीक्षेत यश मिळवून ग्रामीण भागातील विद्यार्थ्याने थोरात घराण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला कर्मचारी भविष्य निधी संस्थेमध्ये एन्फोर्समेंट ऑफिसर या पदाला त्यांनी गवसणी घातली त्यांचे वडील सुरेश थोरात मुख्याध्यापक म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रांजणगाव गणपती येथे कार्यरतआहेत तर आई पुष्पलता थोरात या उपशिक्षक आहेत
सौरभ थोरात यांचे प्राथमिक शिक्षण आमदाबाद या ठिकाणी तर पाचवी ते बारावी शिक्षण विद्याधाम प्रशाला शिरूर येथे झाले त्यानंतर इंजीनियरिंग चे शिक्षण त्यांनी एमआयटी पुणे येथे व एम टेक हे व्हीआय टी पुणे येथे पूर्ण केले नंतर लोकसेवा आयोगाच्या नागरी व वनसेवेच्या परीक्षेची तयारी २०२०पासून केली कर्मचारी भविष्य निधी संस्थेच्या कार्याबद्दलची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी नागरी सेवा परीक्षा बरोबर याही परीक्षेची तयारी सुरू केली नागरी सेवेमध्ये जाण्याची प्रेरणा घरातील सामाजिक वातावरणामुळे मिळाली त्यात माझे आई-वडील शिक्षण क्षेत्रात प्राथमिक शिक्षक असल्याने त्यांच्या कार्याप्रमाणे आपणही समाजासाठी काम करावे याची जाणीव झाली असे सौरभ थोरात यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले . कर्मचारी भविष्य निधी हा कामगार व इतर कुटुंबासाठी गरजेचा असून त्यांना आता या पदावर काम करण्याची संधी मिळणार आहे ध्येय व चिकाटी यामुळे यश मिळतेच !या परीक्षेतील यशामुळे ग्रामस्थ व सर्व थरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे
Discussion about this post