रांजणगाव गणपती प्रतिनिधी :बाळासाहेब कुंभार
बाभूळसर खुर्द शाळेच्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका सौ मंदा चोरे यांना सुवर्णंमुद्रिका देऊन सन्मानित करण्यात आले.आज बाभूळसर खुर्द शाळेतील सौ मंदा अनाजी चोरे आज सेवानिवृत्त झाल्या. शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षकवृंद यांच्या तर्फे सुवर्णमुद्रिका साडी, व त्यांचे पती श्री अनाजी चोरे सरांना पूर्ण पोशाख देऊन सन्मानित करण्यात आले..
सौ मंदा चोरे मॅडम यांनी डोंगरगण, पिंपरखेड, रामलिंग, दसगुडे मळा, राजुरी, मुंजाळवाडी, आमदाबाद, बाभूळसर खुर्द या ठिकाणी जवळ जवळ 37वर्ष नोकरीं केली. त्यांनी प्रत्येक शाळेत तन मन लावून उत्कृष्ट प्रकारे अध्यापन करून खूप विद्यार्थी घडवले.असंख्य विद्यार्थी डॉक्टर, इंजिनियर केले. त्यांची एक मुलगी शिक्षिका असून, दुसरी मुलगी आय टी इंजिनियर आहे. तसेच चिरंजीव उच्च शिक्षितआहे .कार्यक्रमासाठी आज बाभूळसर शाळेत शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य, आजी माजी सरपंच, उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, श्री.भैरवनाथ सैनिक संघटना,चेअरमन वि. का, सोसायटी,कारेगाव केंद्रातील शिक्षक,ग्रामस्थ,महिला,पालक उपस्थित होते, कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. गोरक्ष डाळिंबकरं (अध्यक्ष शाळा व्य. समिती) हे होते,सूत्रसंचालन श्री संतोष लगड सरांनी केले. व आभार श्री. विकास शिंदे अध्यक्ष लहुजी संघटना यांनी मानले.
Discussion about this post