✹ ४ जानेवारी ✹
संत सेवालाल महाराज स्मृतिदिन
जन्म – १५ फेब्रुवारी १७३९ (दावणगेरे,कर्नाटक)
स्मृती – ४ जानेवारी १७७३ (रुईगड,यवतमाळ)
बंजारा समाजाचे आराध्य संत सेवालाल महाराज यांचा जन्म कर्नाटकात झाला. संत सेवालाल महाराजांनी अत्यंत प्रभावी व संवेदनशील अशी सत्यवचने, दोहे सांगून समाजाला सन्मार्गाची जाणीव करून दिली. बंजारा समाज गावागावी भटकत असतांना गाईच्या पाठीवर गहू, ज्वारी, तांदूळ टाकून व्यापार करत असतांना त्यांच्यावर विविध स्वरूपाचे अन्याय होत असत. या अन्यायापासून मुक्ती देण्यासाठी त्यांना स्वाभीमानाचे जिवन जगता यावे यादृष्टीने सेवादास महाराज यांनी प्रयत्न केले. भजन करत असतांना महाराजांच्या भजनात कुठल्याच प्रकारचे वाद्य नसत. दगड गोटे घेवून महाराज भजन करत. सेवादास महाराजांनी माये पासून दूर राहून ब्रम्हचारी राहण्याचा निश्चय आपल्या मनाशी केला होता, काही झाले तरी लग्न करणार नाही असे सेवादास महाराजांनी ठरविले होते. सेवादास महाराजांनी आपल्या मृत्यूपूर्वी आपल्या समाधीची जागा पोहरादेवी ता. मानोरा, जि. वाशीम या गावी मोठया चिंचेच्या झाडाखाली दाखविली होती. पोहरादेवी या गावी समाधी घेतली असल्याने या गावाकडे बघण्याचा बंजारा समाजाचा ष्टीकोन बदलून गेला.
Discussion about this post