जांब/वार्ताहर_रिपोर्टर मयुर कुथे (ता. प्र.मोहाडी)
जांब_दिनांक 3 जानेवारी 2025 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जांब येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जांब येथील मुख्याध्यापिका सौ स्वाती होळंबे मॅडम यांनी इय्यता १ते४ च्या मुलांना सावित्री बाई फुले यांच्या जयंती दिनी सर्व शाळकरी मुलांना सावित्रीबाई फुले यांची जीवनगाथा सांगितली त्यांनी कस कठीण परिश्रमातून महिला शिक्षणाला सुरुवात केली,कधी मुलींची पहिली शाळा उघडली या विषयी शुद्धा मुलांना सांगितले सर्व शाळकरी मुलांनी शांतचित्ताने भाषण येकन घेतले. त्या ठिकाणी जि.प.प्राथमिक शाळा जांब येथील कु. शुभांगी राठोड मॅडम, कु. मंगिता लिल्हारे मॅडम, कु. दर्शना खंडाळे मॅडम, तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. चंद्रसेनजी उताणे, उपाध्यक्ष सौ. वसुंधराताई फटिंग, भूपेशजी अतकरे, स्वप्निलजी पारधी, जनकलालजी सपाटे, अनिल जी बडवाईक, भूपेशजी पवार, सौ दुर्गाताई नागदेवे, किरणताई वनवे, सविताताई मरकाम, अनुसयाताई गोळंगे सदस्य शाळा व्यवस्थापन समिती जांब आदी उपसथित होते.
Discussion about this post