
पनवेल : खेरणे गावी, पनवेल, रायगड येथे मोठया उत्साहाने अखंड हरी नाम सप्ताह साजरा झाला. गेले चार दिवस हरीनामने ढवलून निघाल्या परिवार आज कार्यक्रमाची सांगता झाली. लहान थोर आणि तरुणाईच्या प्रतिसादने आणि परिसरातील सांप्रदाईक मंडळी हजर राहून साप्ताहची शोभा वाढविली. महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार यांची कीर्तन, भजन प्रवचन हरिपाठ काकडा ज्ञानेश्वरी पारायण गीता पठण असे भरगच्च कार्यक्रम झाले. समाजात जन जागृती व्हावी समाज एकत्र राहावं समाजातील रूढी परंपरा यातून समाजाची उन्नती, अनिष्ठ प्रथा पासून परा वृत्त व्हावे हे प्रबोधन घडावे यासाठी असे कार्यक्रम राबविले जातात. ग्रंथ दिंडी मध्ये लहान मुले मुली महिला पुरुष यांनी आपल्या वेषभुषे सहभागी झाले होते. आंनद आणि उत्साह पाहून मन प्रसन्न झाले होते. पुढील वर्षाच्या कार्क्रमांची वाट पाहत आहोत अशी ग्रामस्तांनी मत मांडली..
Discussion about this post