
ता. सिल्लोड जि. छत्रपती संभाजीनगर पीएमश्री प्रशाला पानवडोद येथे राजमाता जिजाऊ माँ साहेब व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शिक्षण महोत्सवाचे उद्घाटन माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ छत्रपती संभाजीनगरचे अध्यक्ष माननीय अनिलजी साबळे यांच्या हस्ते झाले याप्रसंगी गटशिक्षणाधिकारी अनिल पवार सर शिक्षण विस्तार अधिकारी मा.रमेश ठाकूर व पीएमश्री सहा.कार्यक्रमाधिकारी मा.डॉ. सोज्वल जैन सर , शिक्षण विस्तार अधिकारी मा.राजू फुसे, मा.दादाराव फुसे केंद्रप्रमुख मंगलसिंग जाधव, सरपंच श्रीम. भाग्यश्री फुसे, पांडुरंग दौड (अ.शा.व्य. स.) अनिल दौड (शा.व्य.स.) विजय दौड, विक्रांत पाटील दौड, अनिल खरात(प.स.स.) विकास पाटील दौड (त.मु.अ.) आदी मान्यवर उपस्थित होते जिल्ह्यातील सर्व पीएमश्री शाळेतील सर्व मुख्याध्यापक – प्रतिनिधी, तालुक्यातील सर्व केंद्रप्रमुख व उपक्रमशील शिक्षक व विद्यार्थी पालक आणि गावकरी मंडळी उपस्थित होते.
याप्रसंगी शिक्षक श्री दगडू सपकाळ , श्रीम.विजया चापे, श्रीमती भारती मानकर, उर्दू माध्यमातून शहाबुद्दीन शेख केंद्रांतर्गत विशाखा बोर्डे, आत्माराम सोन्ने, रामेश्वर बसेये सर यांना आदर्श शिक्षक (शालेय स्तर) पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच ग्रामपंचायत पानवडोद चे अभूतपूर्व सहकार्यामुळे आदर्श पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. जिल्ह्यातील उत्कृष्ट पीएमश्री म्हणून पीएमश्री प्रशाला सातारा यांना आदर्श पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले प्रस्ताविक मुख्याध्यापक श्री कमलाकर पारधे सर तर सूत्रसंचालन दगडू सपकाळ व विजया चापे तर आभार प्रदर्शन भारती ए मानकर यांनी केले तसेच बी.एस. पाटील, निशिगंधा दलाल, ईसिल तडवी , जमील शेख, कमलाकर गोफणे, बिपिन नाडर, अमोल कालभिले , दिपाली सपकाळ , पवार सर, दिव्या बिरारे , बरोटे मॅडम , शोभाताई दौड , सरलाताई दौड, अंगणवाडी ताई , आशाताई, शालेय पोषण आहार कर्मचारी शाळेचा पूर्ण स्टाफ ,सर्व सहकारी यांचे मोलाचे योगदान कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लाभले आहे असे मत मुख्याध्यापकांनी व्यक्त केले..
Discussion about this post